वृत्तसंस्था
लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांची द्वितीय सून अपर्णा यादव यांनी समाजवादी पार्टी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मात्र या मुद्द्यावरून समाजवादी पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपला टोला लगावला आहे. अपर्णा यादव यांच्या रूपाने समाजवादी पक्षाचा विचारधारेचा विस्तार भाजपमध्ये होतो आहे, असे वक्तव्य अखिलेश यादव यांनी केले आहे. Expansion of socialist ideology in BJP in the form of Aparna Yadav; Akhilesh Yadav’s gangsterism
अपर्णा यादव यांच्या भाजप प्रवेशाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अखिलेश यादव म्हणाले, की प्रथम मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या निमित्ताने समाजवादी विचारधारेचा विस्तार भाजपमध्ये होत आहे. त्यामुळे संविधान आणि लोकशाही वाचविण्याचे काम होईल. नेताजी मुलायमसिंह यादव यांनी समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु त्यांनी ऐकले नाही, असेही अखिलेश यादव यांनी अपर्णा यादव यांच्या बाबतीत सांगितले.
मात्र त्याच वेळी समाजवादी विचारधारेचा भाजपमध्ये विस्तार होतो आहे आणि सविधान लोकशाही वाचवण्याचे काम अपर्णा यादव तेथे जाऊन करती असे वक्तव्य करून भाजपच्या नेत्यांना टोला हाणण्याची संधी अखिलेश यादव यांनी घेतली आहे.
Expansion of socialist ideology in BJP in the form of Aparna Yadav; Akhilesh Yadav’s gangsterism
महत्त्वाच्या बातम्या
- UP Election : मुलायमसिंह यादवांच्या घरात पडली फूट! सून अपर्णा यादव यांचा भाजपमध्ये प्रवेश, म्हणाल्या- माझ्यासाठी राष्ट्रधर्म सर्वोच्च!
- अमित पालेकर गोव्यात आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार
- नारायण राणे, डॉ. भारती पवार, विश्वजीत कदम, धनंजय मुंडे यांना धक्का!!
- दिंडोरी, निफाडमध्ये शिवसेना, सुरगाणा देवळ्यात भाजपची बाजी!!