EX IPS Amitabh Thakur Arrested : उत्तर प्रदेशचे माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. अमिताभ ठाकूर यांना लखनऊच्या हजरतगंज पोलिसांनी अटक केली आहे. सुप्रीम कोर्टाबाहेर जाळून घेणाऱ्या महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकूर यांच्या अटकेचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी दिसत आहेत. ते मिळून अमिताभ ठाकूर यांना कारमध्ये टाकून नेत आहेत. यात अमिताभ ठाकूर पोलिसांना विरोध करतानाही दिसत आहेत. EX IPS Amitabh Thakur Arrested In Lukhnow For allegedly conspiring with bsp mp atul rai
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशचे माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. अमिताभ ठाकूर यांना लखनऊच्या हजरतगंज पोलिसांनी अटक केली आहे. सुप्रीम कोर्टाबाहेर जाळून घेणाऱ्या महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकूर यांच्या अटकेचा व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अनेक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी दिसत आहेत. ते मिळून अमिताभ ठाकूर यांना कारमध्ये टाकून नेत आहेत. यात अमिताभ ठाकूर पोलिसांना विरोध करतानाही दिसत आहेत.
दुसरीकडे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, “माजी पोलिसांच्या विरोधात भाजप सरकारच्या पोलिसांचे अभूतपूर्व काम! लोकांमध्ये तेढ निर्माण करूनच भाजपचे राजकारण टिकते. आता भाजप सरकारच्या दबावामुळे पोलिसांना पोलिसांच्या विरोधात काम करण्यास भाग पाडले जात आहे. निवृत्त आयपीएसला अशी वागणूक अक्षम्य आहे.
माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांच्यावर बलात्कार पीडितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. एसएसआय दयाशंकर द्विवेदी यांच्या तक्रारीच्या आधारे त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली आहे. अमिताभ ठाकूर यांच्यावर बलात्काराचे आरोपी आणि बसपाचे खासदार अतुल राय यांनाही सहकार्य केल्याचा आरोप आहे.
याआधी बलात्कार पीडिता आणि तिच्या मित्राने सर्वोच्च न्यायालयाबाहेर आत्मदहन करताना अमिताभ ठाकूर यांच्यावर अनेक आरोप केले होते. दोघांनाही आत्मदहनादरम्यान गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे साक्षीदार सत्य राय 21 मे रोजी आणि बलात्कार पीडितेचा 25 मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
EX IPS Amitabh Thakur Arrested In Lukhnow For allegedly conspiring with bsp mp atul rai
महत्त्वाच्या बातम्या
- नारायण राणेंची पुन्हा टीका, म्हणाले- “घरात, पिंजऱ्यात राहून काम करणारा मुख्यमंत्री पाहिला नाही!”
- ‘वरुण सरदेसाई पुन्हा आला, तर परत जाणार नाही, आम्ही सोडणार नाही’; नारायण राणेंचा थेट इशारा
- ‘महाराष्ट्रातील असहिष्णुतेचे जनक उद्धव ठाकरे, शिवसेना कोकणविरोधी’ असल्याची आशिष शेलार यांची टीका
- ओबीसींचं राजकीय आरक्षण परत मिळेपर्यंत निवडणुका घेऊ नका, अन्यथा ओबीसींची अपरिमित हानी, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा
- तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून भारत बनेल महासत्ता ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा पुण्यात दृढविश्वास