Thursday, 8 May 2025
  • Download App
    पदभार स्वीकारताच नवे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांचा ट्विटरला इशारा, म्हणाले - देशातील कायद्यांचे पालन करावेच लागेल । EX IAS Aswhini Vaishnav Takes Charge Of IT Ministry, Warns Twitter To Follow New IT Rules

    पदभार स्वीकारताच नवे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांचा ट्विटरला इशारा, म्हणाले – देशातील कायद्यांचे पालन करावेच लागेल

    EX IAS Aswhini Vaishnav Takes Charge Of IT Ministry, Warns Twitter To Follow New IT Rules

    Aswhini Vaishnav Takes Charge Of IT Ministry : माजी सनदी अधिकारी ते आता केंद्रीय मंत्री झालेले अश्विनी वैष्णव यांनी आज माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी ट्विटरला नवीन आयटी नियमांविषयी इशारा दिला आहे. ट्विटरच्या मनमानीवर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना अश्विनी वैष्णव यांनी हे स्पष्ट केले की, देशाचा कायदा सर्वांसाठी समान आहे आणि प्रत्येकाने त्याचे पालन केले पाहिजे. EX IAS Aswhini Vaishnav Takes Charge Of IT Ministry, Warns Twitter To Follow New IT Rules


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : माजी सनदी अधिकारी ते आता केंद्रीय मंत्री झालेले अश्विनी वैष्णव यांनी आज माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि दळणवळण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच त्यांनी ट्विटरला नवीन आयटी नियमांविषयी इशारा दिला आहे. ट्विटरच्या मनमानीवर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना अश्विनी वैष्णव यांनी हे स्पष्ट केले की, देशाचा कायदा सर्वांसाठी समान आहे आणि प्रत्येकाने त्याचे पालन केले पाहिजे.

    दरम्यान, ट्विटरने आज दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, ते आठ आठवड्यांत तक्रार अधिकारी नियुक्त करतील. आयटीच्या नियमांचे पालन करण्यासाठी भारतात संपर्क कार्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेत असल्याचेही ट्विटरने कोर्टाला सांगितले. हे कार्यालय त्यांचे कायमस्वरूपी असेल.

    रविशंकर प्रसाद यांच्या जागी वैष्णव

    संसद सदस्य म्हणून ही वैष्णव यांची पहिली टर्म आहे आणि कॅबिनेट मंत्री म्हणून ते इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय, दळणवळण मंत्रालय आणि रेल्वे मंत्रालयाचे प्रभारी असतील. वैष्णव यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय आणि संप्रेषण मंत्रालयात भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांची जागा घेतली आहे.

    पंतप्रधान मोदींनी देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार – वैष्णव

    कार्यभार घेतल्यानंतर वैष्णव पत्रकारांना म्हणाले, “मला देशाची सेवा करण्याची उत्तम संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधानांचा आभारी आहे. टेलिकॉम, आयटी आणि रेल्वे या तिन्हींमध्ये मोठा ताळमेळ आहे आणि त्यांचे व्हिजन पूर्ण होण्यासाठी मी काम करेन.”

    EX IAS Aswhini Vaishnav Takes Charge Of IT Ministry, Warns Twitter To Follow New IT Rules

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर: मोस्ट वाँटेड मसूद अझहरचे 10 सगेसोयरे ठार; कंधार विमान अपहरणाचा आहे मास्टरमाइंड

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस

    Icon News Hub