वृत्तसंस्था
चंदीगड : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत आतापर्यंत विविध क्षेत्रातील लोक सामील झाले आहेत. यात प्रामुख्याने बॉलिवूड स्टार्स, लिबरल्स यांचा समावेश आहे. पण त्याच वेळी अनेक निवृत्त सैन्यदल अधिकारी देखील या यात्रेत सामील झाले आहेत. यापैकीच एक भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल दीपक कपूर राहुल गांधींबरोबर हरियाणात भारत सहभागी झाले. Ex-Army Chief Gen Deepak Kapoor joined Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra
हेच ते जनरल दीपक कपूर आहेत, ज्यांना भारतीय लष्कराने नेमलेल्या चौकशी समितीने आदर्श सोसायटी घोटाळ्यात दोषी ठरवले होते. त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस केली होती. परंतु तत्कालीन यूपीए सरकारने अशी कारवाई केली नव्हती.
हे प्रकरण 2011 चे आहे. यामध्येच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुंबईत सर्व प्रकारचे नियम धाब्यावर बसून 40 मजल्यांच्या दोन्ही इमारती माजी लष्करी अधिकाऱ्यांनी आपल्या निवृत्तीनंतरच्या निवासासाठी बांधल्या. परंतु त्या बांधताना संरक्षणासारखे महत्त्वाच्या मुद्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले होते. यातला घोटाळा बाहेर आल्यावर अनेक अधिकाऱ्यांची चौकशी झाली त्यामध्ये प्रशासकीय मुलकी अधिकाऱ्यांबरोबरच लष्करी अधिकाऱ्यांचे समावेश होता. यात 10 लष्करी अधिकारी दोशी आढळल्याचे लष्कराच्या चौकशी समितीने स्पष्ट केले होते. यामध्ये जनरल दीपक कपूर यांचा समावेश होता. या इमारतींमुळे सुरक्षाविषयक कुठल्या धोका उत्पन्न होईल असे आम्हाला इमारतींना मंजुरी देताना वाटले नव्हते, अशी साक्ष दीपक कपूर यांनी चौकशी समिती समोर दिली होती.
10 लष्करी अधिकारी दोषी
आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी चौकशी करणार्या लष्कराच्या चौकशी आयोगाने 10 लष्करी अधिकार्यांना दोषी ठरवले होते. यात दोन माजी लष्कर प्रमुखांचा समावेश होता. तशा प्रकारचा रिपोर्टच लष्कराने संरक्षण मंत्रालयाला पाठवला होता.
दोषी अधिकार्यांमध्ये माजी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर आणि जनरल एन. सी. वीज यांचा समावेश होता. तसेच लेफ्टनंट जनरल जी. एस. सिहोता, लेफ्टनंट जनरल पी. के. रामपाल, लेफ्टनंट शंतनू चौधरी, लेफ्टनंट तेजिंदर सिंग, मेजर आर. के. हुडा, मेजर ए. आर. कुमार, मेजर व्ही. एस. यादव आणि मेजर टी. के. कौल यांचा समावेश होता.
Ex-Army Chief Gen Deepak Kapoor joined Rahul Gandhi’s Bharat Jodo Yatra
महत्वाच्या बातम्या
- लिव्ह इन प्रेयसीची जंगलात नेऊन हत्या, आरोपी रिझवानला साथीदार अर्षदसह अटक
- SBI मध्ये नोकरीची संधी; १४३८ जागांसाठी भरती; ऑनलाईन अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस
- आदर्श घोटाळ्यातील दोषी लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर राहुलजींबरोबर भारत जोडो यात्रेत सहभागी
- आता कोणालाही इतिहासतज्ञ झाल्याचे वाटते; महापुरुषांच्या अवमानावरून राज ठाकरे यांचा टोला