• Download App
    कुचबिहारमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांवर हल्ला; निवडणूक हिंसाचारात ४ ठार; निवडणूक आयोगाने रिपोर्ट मागविला; तृणमूळच्या नेत्यांचा सुरक्षा दलांवरच आरोप|entral Forces opened fire twice. In Block 1 of Mathabhanga (Cooch Behar) 1 was killed & 3 injured

    कुचबिहारमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांवर हल्ला; निवडणूक हिंसाचारात ४ ठार; निवडणूक आयोगाने रिपोर्ट मागविला; तृणमूळच्या नेत्यांचा सुरक्षा दलांवरच आरोप

    वृत्तसंस्था

    कोलकाता :  कुचबिहारच्या माथाबंगा, सीताकुलची परिसरात निवडणूक हिंसाचारात ४ ठार तर ४ जण जखमी झाले आहेत. हिंसाचार भडकल्यानंतर केंद्रीय दलांनी हवेत गोळीबार केल्याच्याही बातम्या आहेत.entral Forces opened fire twice. In Block 1 of Mathabhanga (Cooch Behar) 1 was killed & 3 injured

    तृणमूळच्या काही कार्यकर्त्यांनी सीआयएसफच्या जवानाला घेरून त्याची रायफल खेचण्याचा प्रयत्न केला. बूथ नंबर ५ – १२६ येथे हा प्रकार घडल्याची माहिती आहे. त्यानंतर जवानांनी हवेत गोळीबार केला. यात ४ जणांचा मृत्यू झाला, असा दावा तृणमूळ काँग्रेसच्या नेत्या डोला सेन यांनी पत्रकार परिषद घेऊन केला.



    डोला सेन यांनी केंद्रीय दलांवरच अनेक आरोप केले. लोकांना मतदानाला जाण्यापासून केंद्रीय दले रोखत आहेत. ते त्यांच्या मर्यादा ओलांडत आहेत. आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जेव्हा केंद्रीय दलांवर टीका केली,

    तेव्हा निवडणूक आयोगा त्यांनाच नोटीसा पाठवत आहे, अशी टीका डोला सेन यांनी केली आहे. तत्पूर्वी, विरभूम जिल्ह्यात पोलीसांच्या बाँम्ब स्क्वाडने क्रुड बाँम्ब निकामी केले.

    लॉकेट चटर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला

    भाजपच्या खासदार लॉकेट चटर्जी यांच्या ताफ्यावर तसेच मीडियाच्या गाड्यांवर हुगळीत हल्ला करण्यात आला. लॉकेट चटर्जी यांनी तिथूनच निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना फोन लावून हल्ल्याची माहिती देऊन सुरक्षा दलांची जादा कुमक पाठविण्याची मागणी केली.

    entral Forces opened fire twice. In Block 1 of Mathabhanga (Cooch Behar) 1 was killed & 3 injured

    Related posts

    IMF Loan : IMF ने पाकिस्तानला ₹11,000 कोटींचे कर्ज दिले; जगभरातील वाईट परिस्थितीतही अर्थव्यवस्था स्थिर ठेवल्याचा दावा

    NIA Finds : दिल्लीतील बॉम्बस्फोटापूर्वी काश्मिरी जंगलात चाचणी; ‘एनआयए’कडे पुरावे, कटाच्या मुळापर्यंत पोहोचणार

    Lok Sabha : लोकसभेत निवडणूक सुधारणांवर चर्चा, मतचोरीवर वादंग; राहुल गांधींना दुबेंचे उत्तर- पदांचे बक्षीस तर काँग्रेस देत होती