• Download App
    इंजिनिअरींगचे विद्यार्थी दहशतवादी, बारा जणांना जन्मठेपेची शिक्षा | Engineering students sentenced to life imprisonment

    इंजिनिअरींगचे विद्यार्थी दहशतवादी, बारा जणांना जन्मठेपेची शिक्षा

    इंजिनिअरींगचे विद्यार्थीच दहशतदवादी सिध्द झाल्याचा धक्कादायक प्रकार जयपूरमध्ये घडला आहे. जयपूरच्या जिल्हा न्यायालयाने सिमीच्या 13 सदस्यांपैकी 12 जणांना दहशतवादी घोषित केले आहे. न्यायालयाने या सर्वांना जन्मठेपेची शक्षा सुनावली आहे.

    Engineering students sentenced to life imprisonment


    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : इंजिनिअरींगचे विद्यार्थीच दहशतदवादी सिध्द झाल्याचा धक्कादायक प्रकार जयपूरमध्ये घडला आहे. जयपूरच्या जिल्हा न्यायालयाने सिमीच्या 13 सदस्यांपैकी 12 जणांना दहशतवादी घोषित केले आहे. न्यायालयाने या सर्वांना जन्मठेपेची शक्षा सुनावली आहे.

    हे सर्व इंजीनिअरिंगचे विद्यार्थ्यी, दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिदीनसाठी काम करायचे. यांना 2014 मध्ये अटक केली होती. दहशतवादी घोषित झालेल्या आरोपींपैकी 6 सीकरचे, 3 जोधपूरचे, एक-एक जयपूर, एक पाली आणि एक बिहारमधील गयाचा आहे.



     

    राजस्थानमध्ये सिमीच्या स्लीपर सेलशी संबंधित हे प्रकरण 7 वर्षांपुवीर्चे आहे. दिल्लीमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राजस्थानमध्ये 2014 मध्ये जयपुर, सीकर आणि इतर काही जिल्ह्यातील 13 संशयितांना पकडले होते. यांच्यावर आरोप होता की, हे सर्व बंदी घातलेली संघटना सिमीशी संबंधित असून, राजस्थानमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी आले होते.

    पोलीसांनी दावा केला होता की, सिमीच्या स्लीपर सेलला अ‍ॅक्टिव्ह करण्यासाठी जयपुरमधून अटक झालेल्या मारुफचा नातेवाई उमरने इंटरनेटद्वारे यांच्याशी संपर्क साधला होता. यानंतर हे आरोपी अ‍ॅक्टिव्ह होऊन दहशतवादी कारवाया करू लागले. यादरम्यान या सर्वांना अटक करण्यात आली. या प्रकरणाची मागील सात वर्षांपासून सुनावणी सुरू होती.

    Engineering students sentenced to life imprisonment

     

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!