• Download App
    जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार Encounter between security forces and terrorists in Jammu and Kashmirs Pulwama two terrorists killed

    जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार

    नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे रविवारी रात्री उशीरा झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. मिळालेल्या माहितीनुसार, पुलवामाच्या परिगाम भागात झालेल्या या चकमकीदरम्यान एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. मात्र सुरक्षा दलांनी घराला चारही बाजूंनी घेरले आणि दोन दहशतवाद्यांना ठार केले. Encounter between security forces and terrorists in Jammu and Kashmirs Pulwama two terrorists killed

    सुरक्षा दलांना रविवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास परिगम नीवा परिसरात दोन ते तीन दहशतवादी दिसल्याची माहिती मिळाली होती. तसेच, त्यांच्याकडे स्वयंचलित शस्त्रेही असल्याचे सांगण्यात आले होते. माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ जवानांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोहीम सुरू केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. ज्याचे काही वेळातच चकमकीत रूपांतर झाले.

    मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी गावाला वेढा घालायला सुरुवात केली, तेव्हाच एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांना पाहिले. तेथून पळून जाण्यासाठी दहशतवाद्यांनी जवानांवर ग्रेनेड फेकले आणि त्यानंतर गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनी स्वत:ला वाचवत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. या गोळीबाराचे चकमकीत रूपांतर झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या लपून बसलेल्या घरांमधुन अनेक लोकांना बाहेर काढले आणि सुरक्षित स्थळी नेले. जेणेकरून चकमकीदरम्यान कोणाचेही नुकसान होणार नाही. त्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या लपलेल्या ठिकाणाला पूर्णपणे वेढा घातला. यादरम्यान रात्री उशिरा दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र, दोन्ही दहशतवाद्यांच्या मृत्यूला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

    Encounter between security forces and terrorists in Jammu and Kashmirs Pulwama two terrorists killed

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही