• Download App
    पुलवामात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक, एक जवान शहीद, सर्च ऑपरेशन सुरू । Encounter between Security Forces and Terrorist in Pulwama Jammu and Kashmir, One Jawan Martyred

    पुलवामात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक, एक जवान शहीद, सर्च ऑपरेशन सुरू

    Jammu and Kashmir : मागच्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भ्याड कृत्ये केली आहेत. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि प्रत्येक वळणावर सुरक्षा दलांना उघडपणे आव्हान दिले जात आहे. आता याच भागात पुलवामाच्या हंजिन राजपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक उडाली आहे. Encounter between Security Forces and Terrorist in Pulwama Jammu and Kashmir, One Jawan Martyred


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भ्याड कृत्ये केली आहेत. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि प्रत्येक वळणावर सुरक्षा दलांना उघडपणे आव्हान दिले जात आहे. आता याच भागात पुलवामाच्या हंजिन राजपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक उडाली आहे.

    गुरुवारी उशिरा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सुरक्षा दलाने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, दहशतवाद्यांच्या गोळीबारात सैन्याच्या एका जवानालाही गोळ्या लागल्या. उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू झाला. हे एन्काउंटर अजूनही सुरू आहे.

    पुलवामात दहशतवादी

    या चकमकीमुळे तेथे तीन ते चार दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली आहे. अशा परिस्थितीत सुरक्षा दलांनी पहाटेच शोध मोहीम सुरू केली आहे. सध्या परिसरातील सर्व एंट्री आणि एक्झिट पॉइंट बंद केले आहेत. लपलेल्या दहशतवाद्यांना पळण्यापासून रोखण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. सैन्याची शोधमोहीम सुरू असून त्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

    Encounter between Security Forces and Terrorist in Pulwama Jammu and Kashmir, One Jawan Martyred

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक