• Download App
    सहकार क्षेत्रात पारदर्शकतेला महत्त्व द्या; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांचे पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनात परखड बोल|Emphasize transparency in the field of co-operation; Union Co-operation Minister Amit Shah speaks at the first National Co-operation Conference

    सहकार क्षेत्रात पारदर्शकतेला महत्त्व द्या; केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांचे पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनात परखड बोल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार क्षेत्राला विकासात योगदान देण्यासाठी प्रचंड वाव आहे. परंतु सहकार क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेला प्राधान्य दिले पाहिजे, असे परखड बोल देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शहा यांनी सहकार क्षेत्राला सुनावले आहेतEmphasize transparency in the field of co-operation; Union Co-operation Minister Amit Shah speaks at the first National Co-operation Conference

    दिल्लीत पहिल्या ‘राष्ट्रीय सहकार संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले आहे या संमेलनाला सहकारमंत्री अमित शहा यांनी संबोधित केले. देशातील सहकार क्षेत्रास जागतिक पातळीवर संधी उपलब्ध करून देणे आणि सहकार व्यवस्थेस मजबूती प्रदान करणे, हा या संमेलनाचा उद्देश आहे.



    देशातील विविध राज्यांतील आणि विविध सहकारी क्षेत्रातील सुमारे २ हजार प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा आणि आंतरराष्ट्रीय कोऑपरेटिव्ह अलायन्सचे (ग्लोबल) अध्यक्ष एरियल ग्वार्को उपस्थित होते.

    अमित शहा म्हणाले, की भारतात सहकार क्षेत्राचा इतिहास खूप जुना आहे. सहकार क्षेत्राने देशाच्या विकासात खूप मोठे योगदान केले आहे. पण काळाच्या ओघात या क्षेत्रांमध्ये काही अपप्रवृत्ती शिरल्या आहेत. त्यांचा नायनाट करून सहकार क्षेत्राने नवी दृष्टी विकसित केली पाहिजे.

    हा नवा विचार स्वीकरून आपल्या क्षेत्राची व्याप्ती वाढवली पाहिजे आणि प्रामुख्याने आपल्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणली पाहिजे. ही सहकार क्षेत्राची जबाबदारी आहे. यातून देशाच्या विकासात सहकार क्षेत्र आणखी मोलाची कामगिरी करेल, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला. पंडित दीनदयाळजींच्या अंत्योदय विचारांचा जागरही त्यांनी केला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केली असून त्याची धुरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. देशातील सहकारी चळवळ मजबूत करणे, कार्यक्षमता वाढविणे आणि सहकारी समित्यांसाठीच्या ‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ प्रक्रियांना सुव्यवस्थित स्वरूप प्रदान करण्यासाठी या मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली आहे.

    त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सहकारातून समृद्धीकडे’ हे उद्दिष्ट मंत्रालयाच्या केंद्रस्थानी आहे. या मंत्रालयाच्या स्थापनेनंतर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी प्रथमच देशभरातील सहकारी संस्थांना संबोधित केले आहे. त्यांनी पारदर्शकतेच्या मुद्याला महत्त्व दिल्याने महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात शिरलेल्या अपप्रवृत्तींचा दृष्टीने वेगळा “संदेश” दिला गेला आहे.

    राष्ट्रीय सहकार संमेलनाचे आयोजन इंदिरा गांधी इनडोअर स्टेडीयममध्ये करण्यात आले आहे. भारताची अग्रणी सहकार संस्था इफ्को, भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ, अमुल, सहकार भारती, नाफेड, कृभको आणि देशभरातील सहकारी संस्थांनी या परिषदेच्या आयोजनात पुढाकार घेतला आहे.

    Emphasize transparency in the field of co-operation; Union Co-operation Minister Amit Shah speaks at the first National Co-operation Conference

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य