• Download App
    मराठमोळ्या तरुणाची कमाल! 'कचर्‍यापासून शूज' स्टार्टअपसाठी आनंद महिंद्रांनी दिली कोट्यवधींची ऑफरEmbarrassed I didn’t know about this inspiring startup. These are the kinds of startups we need to cheer

    Thaely Startup : मराठमोळ्या तरुणाची कमाल! ‘कचर्‍यापासून शूज’ स्टार्टअपसाठी आनंद महिंद्रांनी दिली कोट्यवधींची ऑफर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मोदी सरकारच्या स्टार्ट अप इंडियामुळे अनेक तरुणांना आपली प्रतीभा दाखवता येत आहे.अशाच एका नवीन स्टार्टअपला (Thaely Startup) चक्क आनंद महिंद्रा यांनी कोट्यवधींची ऑफर दिली आहे.Embarrassed I didn’t know about this inspiring startup. These are the kinds of startups we need to cheer

    टेक्नॉलॉजीमुळे अशक्य असं काहीही नाही. जशी टेक्नॉलॉजी पुढे जात आहे त्याच पद्धतीनं विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत आहेत.

    विशेष म्हणजे कचऱ्यापासून शूज निर्मिती करणारं हे स्टार्टअप एका मराठी व्यक्तीचं आहे. आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर नवनवीन व्हिडिओ किंवा फोटो शेअर करत असतात. तसंच काही प्रेरणादायी स्टोरीजही पोस्ट करत असतात.

    नुकतीच आनंद महिंद्रा यांनी आशय भावे यान तेवीस वर्षीय मराठमोळ्या तरुणाच्या एका स्टार्टअपबद्दल पोस्ट केली आहे. या आशयनं कचऱ्यापासून शूज निर्मिती सुरु केलीय.

    याबद्दलची माहिती मिळताच आनंद महिंद्रा यांनी त्याच्या स्टार्टअपसाठी कोट्यवधींची ऑफर दिली आहे. आनंद महिंद्रा यांनी याबद्दलचं ट्विट केलं आहे.

    एक फोटो पोस्ट करत आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलं आहे. ” या प्रेरणादायी स्टार्टअपबद्दल याआधी माहिती नसल्याची खंत वाटते. मी या शूजची एक जोडी नक्की खरेदी करणार आहे. अशा स्टार्टअपना प्रोत्साहन मिळालं पाहिजे. जेव्हा या स्टार्टअप साठी फंड गोळा कराल तेव्हा आमचाही विचार करा” असं महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.

    काय आहे ‘थैली’

    आशय भावे यांनी जुलै 2021 मध्ये हा स्टार्टअप सुरू केला. ‘Thaely’ असं त्याचं नाव आहे. कंपनीनं 50 हजारांहून अधिक प्लास्टिक पिशव्या आणि 35 हजार प्लास्टिक बाटल्यांमधील साहित्याचा पुनर्वापर केला आहे. 2017 मध्ये बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA) चे शिक्षण घेत असताना भावे यांना या व्यवसायाची कल्पना सुचली.

    हा त्याच्या कॉलेजच्या दिवसांपासूनचा एक प्रोजेक्ट होता, ज्यावर त्यानं काम केलं. आता या तरुण उद्योजकाची कल्पना यशस्वी बिझनेस मॉडेल बनली आहे. सध्या, कंपनी शूजच्या मार्केटमध्ये लहान दिसत आहे, परंतु कंपनीची लवकरच युरोप आणि अमेरिकेच्या बाजारपेठेत आपले प्रोडक्ट्स लाँच करण्याची योजना आहे.

    तरुण वयात भारतातील एक स्टार्टअप आंतरराष्ट्रीय बाजारात भरारी घ्यायला तयार आहे.

    Embarrassed I didn’t know about this inspiring startup. These are the kinds of startups we need to cheer

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’