TMC leader Sujata Mandal : निवडणूक आयोगाने तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या सुजाता मंडल यांना दलितांविरुद्ध केलेल्या त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यासाठी नोटीस बजावली आहे. यानुसार 24 तासांत त्यांना उत्तर मागण्यात आले आहे. भाजपा नेत्याच्या तक्रारीवरून आयोगाने ही कारवाई केली आहे. सुजाता मंडल यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अनुसूचित जातीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. Election Commission issues notice to TMC leader Sujata Mondal, For her offensive remarks against Dalits
विशेष प्रतिनिधी
कोलकाता : निवडणूक आयोगाने तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या सुजाता मंडल यांना दलितांविरुद्ध केलेल्या त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यासाठी नोटीस बजावली आहे. यानुसार 24 तासांत त्यांना उत्तर मागण्यात आले आहे. भाजपा नेत्याच्या तक्रारीवरून आयोगाने ही कारवाई केली आहे. सुजाता मंडल यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अनुसूचित जातीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पश्चिम बंगाल निवडणुकीच्या वेळी नेत्यांनी आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्यांनी प्रचारसभा गाजवल्या. या कारणास्तव अलीकडेच आयोगाने भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर निर्बंध घातले होते. निवडणूक आयोगाच्या रोषाची झळ ममता बॅनर्जी ते दिलीप घोष यांनाही बसली.
भिकाऱ्यांशी केली होती तुलना
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सुजाता मंडल यांनी काही दिवसांपूर्वी कथितरीत्या अनुसूचित जातीतील लोकांची तुलना भिकाऱ्यांशी केली होती. याविरुद्ध भाजपचे महासचिव दुष्यंत गौतम यांच्या नेतृत्वात पक्षातील नेत्यांच्या एका प्रतिनिधी मंडळाने गत सोमसारी अनुसूचित जाती आयोगाकडे दाद मागितली आणि निवेदन सोपवून सुजाता मंडल यांच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली होती.
Election Commission issues notice to TMC leader Sujata Mondal, For her offensive remarks against Dalits
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानात WhatsApp, Facebook आणि Twitterवर बंदी, हे आहे कारण
- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण, स्वत: ट्वीट करून दिली माहिती
- Maharashtra Lockdown 2021 : राज्यात लॉकडाऊन पण रुग्णसंख्या वाढतीच, पहिल्यांदाच 24 तासांत 64 हजारांहून जास्त बाधितांची नोंद
- CBSE नंतर आता ICSE आणि ISC बोर्डाच्या परीक्षाही स्थगित, नव्या तारखांबाबत जूनमध्ये निर्णय
- Tesla Cars India : टेस्लाने भारतात कारचे उत्पादन केले, तर आम्ही मदतच करू! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी