विशेष प्रतिनिधी
कोलकता : सीतलकुचीमधील हिंसाचाराबाबत प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी भाजप नेते सायंतन बसू यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यांनी एकाला मारले तर आम्ही चार जणांचा बळी घेऊ असे म्हणताना त्यांनी शोलेतील डायलॉगचा संदर्भ दिला होता.election commission gives notice to BJP leader
हे वक्तव्य आचारसंहिता, लोकप्रतिनिधित्व कायदा आणि भारतीय दंडसंहितेचा भंग करते असा ठपका आयोगाने ठेवला. हे वक्तव्य म्हणजे बंगाल आणि राज्यातील जनतेला खुली धमकी असल्याचे आयोगाने नोटिशीत नमूद केले आहे.
बसू यांनी प्रक्षोभक वक्तव्य केले होते.
ते म्हणाले होते की, मी, सायंतन बसू, तुम्हाला हे बजावण्यास आलो आहे की तुम्ही अकारण आव्हान देऊ नका. आम्ही सीतलकुचीचा खेळ खेळू. त्यांनी आधी सकाळी १८ वर्षांचा आनंद बर्मनला मारले. भाजपच्या शाखाप्रमुखांचा तो भाऊ होता.
आम्हाला फार वाट पाहावी लागली नाही. त्यांच्यातील चार जणांना यमसदनास धाडण्यात आले. शोले चित्रपटातील हा डायलॉग तुम्हाला ठाऊक आहे. तुम्ही एक मारलात तर आम्ही चार मारू. सीतलकुची गाव याचे साक्षीदार बनले.