• Download App
    पोस्ट ऑफिसच्या “या “आठ योजना तुमच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्हाला करतील मालामाल Eight Schemes of Post Office

    पोस्ट ऑफिसच्या “या “आठ योजना तुमच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्हाला करतील मालामाल

    • सुरक्षिततेसह भरपूर परताव्या सह भरपूर फायदा.
    • ” एकदा या योजनानं बद्दल जाणून घ्या. तुम्हालाही गुंतवणुकीचा मोह आवरणार नाही!”

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : सर्वसामान्य जनतेला आर्थिक साक्षर करण्यासाठी आणि बचतीचं वं गुंतवणुकीचे महत्त्व समजावं या उद्देशाने केंद्र सरकारच्या वतीने पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून अनेक चांगल्या चांगल्या योजना सध्या राबवल्या जात आहेत.
    म्युच्युअल फंड किंवा इक्विटी मध्ये मोठ्या प्रमाणावर रिस्क असल्याने सर्वसामान्य लोक बचत करण्यासाठी घाबरतात . मात्र पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून या योजना राबवून लोकांना गुंतवणुकीची सवय लावणे आणि कुठल्याही प्रकारचा धोका त्यांच्या बचतीस गुंतवणुकीस न लागू देणे या उद्देशाने या योजना अतिशय उत्तम आहेत. Eight Schemes of Post Office

    इक्विटी आणि म्युच्युअल फंडाच्या काळात देखील पोस्ट ऑफिसच्या या योजना सध्या लोकांमध्ये लोकप्रिय आहेत.

    जाणून घेऊयात या सर्वसामान्यांना मालामाल करणाऱ्या आठ योजनांबद्दल .

    यामध्ये टाइम डिपॉझिट (TD), राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना (MIS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), किसान विकास पत्र (KVP), सुकन्या समृद्धी योजना (SSY), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव (RD) यांचा समावेश आहे.

    • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
      व्याजदर : वार्षिक ७.१ टक्के
      वार्षिक कमाल गुंतवणूक: १.५ लाख रुपये
      किमान गुंतवणूक: ५०० रुपये
      मॅच्युरिटी: १५ वर्षे, परंतु आणखी ५ वर्षे वाढवण्याच्या पर्यायासह
      कर लाभ: EEE श्रेणी
    • ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
      व्याजदर : वार्षिक ८.२ टक्के
      परिपक्वता: ५ वर्षे
      कमाल ठेव: १५ लाख
      किमान ठेव: १००० रुपये
      कर लाभ: गुंतवणुकीवर ८० सी अंतर्गत वार्षिक १.५० वजा केले जातात. आर्थिक वर्षात मिळालेले व्याज ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास TDS कापला जातो.
    • सुकन्या समृद्धी योजना (SSY)
      व्याजदर : ८.०% प्रतिवर्ष
      परिपक्वता: २१ वर्षे
      कमाल ठेव: वार्षिक १.५० लाख
      किमान ठेव: २५० रुपये
      कर लाभ: EEE श्रेणी
      म्हणजेच वार्षिक १.५० लाख गुंतवणुकीवर प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर सवलत, मिळालेल्या व्याजावरील कर सूट आणि परिपक्वतेवर मिळालेली रक्कम देखील करमुक्त आहे.
    • राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC)
      व्याजदर: वार्षिक ७.७ टक्के
      परिपक्वता: ५ वर्षे
      कमाल ठेव: कोणतीही मर्यादा नाही
      किमान ठेव: १००० रुपये
      कर लाभ: १.५० रुपयांपर्यंत गुंतवलेली रक्कम प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अंतर्गत कर सवलतीसाठी पात्र आहे.
    • टाइम डिपॉझिट (TD)
      १ वर्षाच्या योजनेवर व्याज : ६.९% प्रतिवर्ष
      २ वर्षांच्या योजनेवर व्याज : ७.०% प्रतिवर्ष
      ३ वर्षांच्या योजनेवर व्याज : ७.०% प्रतिवर्ष
      ५ वर्षांच्या योजनेवर व्याज : ७.७% प्रतिवर्ष
      कमाल ठेव: कोणतीही मर्यादा नाही
      किमान ठेव: १००० रुपये
      कर लाभ: १.५० पर्यंत गुंतवलेल्या रकमेवर ८० सी अंतर्गत कर सूट. परंतु व्याजातून मिळणारे उत्पन्न ४० हजार किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास टीडीएस कापला जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी मर्यादा ५० हजार आहे.
    • आवर्ती ठेव (RD)
      व्याजदर : वार्षिक ६.५ टक्के
      कमाल ठेव: कोणतीही मर्यादा नाही
      किमान ठेव: १०० रुपये मासिक
      मॅच्युरिटी: ५ वर्षे, जी आणखी ५ वर्षे वाढवली जाऊ शकते.
      कर लाभ: नाही
      जर RD चे व्याज उत्पन्न ४०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर १० टक्के TDS आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा ५०,००० रुपये आहे.
    • किसान विकास पत्र (KVP)
      व्याजदर : वार्षिक ७.५ टक्के
      परिपक्वता: ११५ महिने
      कमाल ठेव: कोणतीही मर्यादा नाही
      किमान ठेव: १००० रुपये
      कर लाभ: नाही
    • मासिक उत्पन्न योजना (MIS)
      व्याजदर : वार्षिक ७.४ टक्के
      मॅच्युरिटी: ५ वर्षे, त्यानंतर त्यावेळच्या व्याजानुसार ५ वर्षांसाठी नवीन खाते उघडता येते
      कमाल ठेव: ४.५० एकल खाते, ९ लाख संयुक्त खाते
      कर लाभ: नाही
      पोस्ट ऑफिस बचत योजना अधिक चांगल्या आहेत, कारण तुमचे जमा केलेले पैसे येथे सुरक्षित राहतात. येथे जमा होणारा निधी सरकारच्या कामांसाठी वापरला जातो. त्यामुळे सरकार त्यांना सार्वभौम हमी देते. म्हणजे गुंतवणुकीवर १०० टक्के सुरक्षा मिळते. यामध्ये काही योजनांवर करमाफीचा लाभही मिळतो. यामध्ये निश्चित व्याजानुसार परतावा मिळतो.

    Eight Schemes of Post Office

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य