Eid-ul-Adha : ईद-अल-अधा किंवा बकरीद हा सण आज देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, सर्वसमावेशक समाजात ऐक्य आणि बंधुतेसाठी एकत्र काम करण्याचा हा सण आहे. दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनी या दिवसाला सामूहिक सहानुभूती, समरसता आणि अधिकाधिक चांगल्या सेवेत सामावून घेण्याची भावना पुढे आणावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. eid-ul-adha president and prime minister Modi congratulates eid al adha wished for harmony and love
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ईद-अल-अधा किंवा बकरीद हा सण आज देशभरात साजरा होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, सर्वसमावेशक समाजात ऐक्य आणि बंधुतेसाठी एकत्र काम करण्याचा हा सण आहे. दुसरीकडे, पंतप्रधान मोदींनी या दिवसाला सामूहिक सहानुभूती, समरसता आणि अधिकाधिक चांगल्या सेवेत सामावून घेण्याची भावना पुढे आणावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
राष्ट्रपती कोविंद यांनी ट्विट केले की, “सर्व देशवासीयांना ईद मुबारक! ईद- उज – जुहा हा प्रेम, त्याग आणि बलिदानाच्या भावनेचा आदर करण्याचा आणि सर्वसमावेशक समाजात ऐक्य आणि बंधुतेसाठी एकत्र काम करण्याचा सण आहे. कोविड-19च्या विरोधात प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करून समाजातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी काम करण्याचे वचन घेऊया.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, ईद मुबारक! ईद-उल-अधाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस सामूहिक सहानुभूती, समरसता आणि अधिकाधिक चांगल्याच्या सेवेत सामावून घेण्याची भावना पुढे आणू शकेल.
बकरीदचा सण कुर्बानीचा दिवस म्हणूनही लक्षात ठेवला जातो. इस्लामिक कॅलेंडरनुसार बलिदानांचा उत्सव बकरीद हा रमजानच्या दोन महिन्यांनंतर येतो. ईद-अल-अधाला आपल्या देशाव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी बकरीद म्हटले जात नाही. या दिवशी बकरीचे बलिदान सहसा दिले जाते, म्हणून आपल्या देशात याला बकरीद असेही म्हणतात. आजच्या दिवशी बकरे अल्लाहला कुर्बान केले जातात. या धार्मिक प्रक्रियेस फर्ज-ए-कुर्बान म्हटले जाते.
या विशेष प्रसंगी ईद-उल-अधाची नमाज ईदगाह आणि प्रमुख मशिदींमध्ये सकाळी 6 ते सकाळी 10.30 या वेळेत अदा करण्यात येत आहे. गतवर्षी कोरोना संक्रमणाच्या सावटामुळे लोकांना घरातून नमाज अदा करावी लागली होती.
eid-ul-adha president and prime minister Modi congratulates eid al adha wished for harmony and love
महत्त्वाच्या बातम्या
- pegasus Controversy : संसदेच्या बाहेरही सरकारला घेरणार काँग्रेस, वेगवेगळ्या राज्यांत घेणार पत्रकार परिषदा
- ‘पेगॅसस’चे बाप कोण? केंद्राच्या संमतीशिवाय हे होऊच शकत नाही, शिवसेनेचे सामनातून केंद्रावर टीकास्त्र
- शरद पवारांनी पाहिलेले स्वप्न होणार पूर्ण! लष्कराच्या जागा विकसित होणार पण खासगी उद्योगांसाठी नव्हे तर पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी, मोदी सरकारचा क्रांतीकारण निर्णय
- पाळत ठेवलेल्याचा दावा चुकीचा, नावांची यादीही चुकीची, बनावट माहितीवर अवलंबून लोकांची दिशाभूल करू नका, पेगासस स्पायवेअरच्या निर्मात्यांनी एनडीटीव्हीला सुनावले
- देशातील ६७ टक्के लोकसंख्येत कोरोनाविरोधात अॅँटीबॉडी विकसित, आयसीएमआरच्या चौथ्या सिरो सर्व्हेत दिलासादायक माहिती, प्राथमिक शाळाही सुरू करण्याचा सल्ला