• Download App
    “उत्तर प्रदेशमध्ये रस्त्यांवर ईदची नमाज होत नाही, कारण सर्वांना माहीत आहे इथे...” मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं विधान! Eid Namaz is not held on the roads in Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath statement

    “उत्तर प्रदेशमध्ये रस्त्यांवर ईदची नमाज होत नाही, कारण सर्वांना माहीत आहे इथे…” मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं विधान!

    ’आझमगडसारख्या जिल्ह्याच्या नावाला पूर्वी लोक घाबरायचे. मात्र आज… असंही योगींनी म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : देशभरात रमजान महिना संपल्यानिमित्त शनिवारी ईद साजरी केली गेली. ईद निमित्त मुस्लिम बांधवांनी दिल्लीच्या जामा मशि‍दीसह अन्य अन्य मशि‍दींमध्ये नमाज अदा केली आणि गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, या ईदच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे एक विधान समोर आले आहे. Eid Namaz is not held on the roads in Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath statement

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले की, ‘’उत्तर प्रदेशाही ईदची नमाज अदा केली जात आहे, मात्र कुठेही रस्त्यांवर नमाज पठण होत नाहीए आणि कोणत्याही मार्गाची वाहतूकही बंद नाही. कारण, सर्वांना माहीत आहे की इथे कायद्याचे राज्य आहे आणि ते सर्वांसाठी समान आहे.’’

    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांच्या 24 व्या राष्ट्रीय परिषदेला हजेरी लावली. ते पुढे म्हणाले की, ‘’आझमगडसारख्या जिल्ह्याच्या नावाला पूर्वी लोक घाबरायचे. मात्र आज आझमगड एक्स्प्रेसही आज महामार्गाशी जोडली गेली आहे, आझमगड जिल्ह्यात विमानतळही बांधले जात आहे. आझमगडमध्ये एक विद्यापीठही बांधले जात आहे. आज कोणतीही भीती नाही, कोणत्याही प्रकारची अराजकता नाही.’’

    Eid Namaz is not held on the roads in Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath statement

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!