वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू – काश्मीर मध्ये दहशतवाद्यांशी लढण्यासाठी सीआरपीएफ ग्राम विकास समितीच्या अंतर्गत गावकऱ्यांना बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण देणार आहे.Effective countering of terrorists in Kashmir; Weapons training to villagers
गेल्या काही दिवसात पुँछ आणि राजौरीमध्ये झालेल्या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राजौरी जिल्ह्यातील धनगरीमध्ये प्रत्येक ग्रामरक्षा समितीतील एखाद्या सदस्याला SLR रायफल देण्यात येणार आहे. तर काही ग्राम रक्षा समित्यांमध्ये दोन ते तीन सदस्यांना स्वयंचलित रायफल्स देण्यात येणार आहेत.
३०३ शस्त्रास्त्रांचे वाटप
राजौरी जिल्ह्यातील धनगरी गावात सोमवारी, ९ जानेवारी रोजी एक विशेष शिबीर राबवण्यात आले, यात जवळपास १०० सदस्यांना शस्त्र देण्यात आली. यात ४० माजी सैनिकांचा समावेश आहे. ज्यांना एसएलआर रायफल देण्यात आली आहे.
पोलिसांच्या शिबीरात ६० स्थानिक लोकांना देखील बंदुक देण्यात आली. आतापर्यंत एकूण ३०३ शस्त्रांचे वाटप करण्यात आले. ४० माजी सैनिकांना सेल्फ-लोडिंग रायफल देण्यात आल्या आहेत. त्यातून दहशतवाद्यांना तात्काळ उत्तर देता येईल.
Effective countering of terrorists in Kashmir; Weapons training to villagers
महत्वाच्या बातम्या