• Download App
    नागरिकांना दिलासा; खाद्यतेलाच्या किंमती आणखी १० रुपयांनी कमी होण्याची शक्यता!! Edible oil prices likely to decrease by Rs

    नागरिकांना दिलासा; खाद्यतेलाच्या किंमती आणखी १० रुपयांनी कमी होण्याची शक्यता!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : आगामी दहीहंडी, गौरी गणपती सणांच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांना तेलाच्या किंमतीमध्ये 10 रुपयांपर्यंत दर कमी करण्याच्या सूचना सरकार करण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यास सामान्यांना महागाईतून मोठा दिलासा मिळेल. तेलाच्या किमती कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत असून खाद्यतेलांचे परीक्षण करण्यासाठी गुरूवारी खाद्य विभागाच्या सचिवांनी तेल कंपन्यांबरोबर बैठक आयोजित केली होती. Edible oil prices likely to decrease by Rs

    8 ते 10 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

    सरकारने खाद्यतेलाच्या किमती आणखी कमी करण्याचा निर्णय घेतल्यास सामान्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मागील महिन्यात तेल कंपन्यांनी 20 ते 25 रुपयांची घट केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही खाद्यतेलांच्या किंमती कमी झाल्यामुळे त्याचा फायदा छोट्या बाजारांना सुद्धा होत आहे. अन्न सचिवांशी झालेल्या बैठकीनंतर खाद्यतेल सुमारे 8 ते 10 रुपयांनी स्वस्त होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

    गेल्या महिन्यात काही तेल कंपन्यांनी 20 ते 25 रुपयांनी कपात केली होती त्यामुळे त्याचा परिणाम किरकोळ बाजारात सुद्धा दिसून येत आहे. भारत गरजेनुसार 60 % तेल आयात करतो आणि यामुळेच भारतातील तेलाच्या किंमती परदेशातील किमतीवर अवलंबून आहेत

    Edible oil prices likely to decrease by Rs

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Phaltan : माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांचा संताप, SIT चौकशीसह प्रकरण बीड कोर्टात चालवण्याची मागणी

    Central Govt : केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता; 1 जानेवारीपासून लागू होऊ शकतो, 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा