Edible Oil Prices : भारतात गेल्या काही दिवसांपासून जास्त असलेल्या खाद्यतेलाच्या किंमती आता कमी होताना दिसत आहेत. जनतेला वाढत्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने आयात शुल्क कमी करण्यासह अनेक पावले उचलली आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांना आता तेलाच्या महागड्या किमतीपासून दिलासा मिळू लागला आहे. Edible Oil Prices Government reduced import duty on edible oils, reduction in prices
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतात गेल्या काही दिवसांपासून जास्त असलेल्या खाद्यतेलाच्या किंमती आता कमी होताना दिसत आहेत. जनतेला वाढत्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने आयात शुल्क कमी करण्यासह अनेक पावले उचलली आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांना आता तेलाच्या महागड्या किमतीपासून दिलासा मिळू लागला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतात खाद्यतेलांचे उत्पादन कमी आहे, वापर जास्त आहे. अशा परिस्थितीत भारत परदेशातून मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात करतो. देशांतर्गत उत्पादनाबरोबरच भारतातील खाद्य तेलाच्या किमतीचा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरही परिणाम होतो. भारतात जास्त मागणी असल्यास आणि बाहेर पुरवठा कमी असल्यास दर वाढतात. दुसरीकडे देशात आणि परदेशात तेलाचे जास्त उत्पादन झाले तर किमती खाली येतील.
किमती 20 टक्क्यांपर्यंत घसरल्या
केंद्रीय अन्न ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, खाद्य तेलांच्या किमती सुमारे 20 टक्क्यांनी खाली आल्या आहेत. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सोयाबीनचे पुढील पीक ऑक्टोबरमध्ये येईल. सध्या बाजारात चांगल्या सोयाबीनच्या आवक कमी आहे. सरकारच्या निर्णयानंतर खाद्यतेलांचे नवीन दर पुढीलप्रमाणे झाले आहेत.
- पाम तेलाची किंमत प्रति किलो 142 रुपयांवरून घसरून 115 रुपये झाली आहे. याप्रकारे, त्याचे दर सुमारे 19 टक्क्यांनी खाली आले आहेत.
- 21 मे रोजी सूर्यफूल तेल 188 रुपये प्रति किलो होते. ज्याची किंमत 16 टक्क्यांनी घटून 157 रुपये प्रति किलो झाली आहे.
- सोया तेलाचे दर 15 टक्क्यांनी आणि मोहरीच्या तेलाच्या किमतीत सुमारे 10 टक्क्यांनी घट झाली आहे.
- मोहरीच्या तेलाबद्दल सांगायचे तर ते 16 मे रोजी 175 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात होते. आता त्याची किंमत प्रति किलो 157 रुपयांवर गेली आहे. त्याचे दर 10 टक्क्यांनी खाली आले आहेत.
- गेल्या महिन्यात खोबरेल तेलाची किंमत प्रति किलो 190 रुपये झाली होती. त्याचे दर 8 टक्क्यांनी खाली आले आहेत आणि ते आता 157 रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहेत.
- वनस्पती तुपाबद्दल बोलायचे तर गेल्या महिन्यात त्याची किंमत 154 रुपये किलो झाली होती. आता त्याचे दरही 8 टक्क्यांनी खाली आले आहेत आणि ते 141 रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे.
उत्पादनामध्ये आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न
भारतात खाद्यतेलांची मागणी आणि पुरवठा यात बरेच अंतर आहे. याचे कारण असे आहे की भारतातील खाद्य तेलांच्या मागणीच्या प्रमाणात उत्पादन कमी आहे. यामुळे परदेशातून होणाऱ्या आयातीवर अवलंबून राहावे लागते. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सरकार आता मध्यम आणि दीर्घ मुदतीच्या उपाययोजना करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
देशातील खाद्य तेलांचे उत्पादन वाढविण्यासाठी आता सरकार आराखडा तयार करत आहे. यासाठी योजना आणि प्रोत्साहन रक्कमदेखील शेतकऱ्यांसाठी जाहीर करता येईल. शेतकऱ्यांनी पिकात बदल करून खाद्यतेल उत्पादनास प्राधान्य द्यावे अशी सरकारची इच्छा आहे. असे केल्याने शेतकर्यांचे उत्पन्नही वाढेल आणि त्याचबरोबर देशाच्या गरजादेखील पूर्ण होतील.
Edible Oil Prices Government reduced import duty on edible oils, reduction in prices
महत्त्वाच्या बातम्या
- ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, 20 वसतिगृहांच्या उभारणीसह, पदभरतीही करणार
- या १८ घटना काय सांगतात? जेव्हा बळजबरी ‘जय श्री राम’ म्हणायला लावल्याचे दावे खोटे ठरले
- Ghaziabad Viral Video : भाजप आमदाराची तक्रार; राहुल गांधी, ओवैसींवर रासुका लावण्याची मागणी
- मुस्लिम वृद्धाच्या मारहाणीच्या व्हिडिओवरून वाद, स्वरा भास्कर आणि पत्रकार आरफा खानमविरोधात तक्रार दाखल; चिथावणीखोर ट्विटचा आरोप
- भारतीय वंशाच्या सत्या नाडेला यांना बढती, मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षपदी नेमणूक