• Download App
    मल्ल्या, नीरव आणि चोकसीला ईडीचा दणका, बँकांच्या समूहाने वसूल केले 792.11 कोटी रुपये । ED Said SBI Led Consortium Recovers Rs 792 Cr By Selling Shares Of Mallya Nirav Modi Choksi

    कर्जबुडव्या मल्ल्या, नीरव मोदी आणि चोकसीला ईडीचा दणका, बँकांच्या समूहाने वसूल केले 792.11 कोटी रुपये

    SBI Led Consortium Recovers Rs 792 Cr : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सांगितले की, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या नेतृत्वात कर्ज देणाऱ्या बँकांच्या गटाने विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या जप्त केलेल्या शेअर्सच्या विक्रीतून 792.11 कोटी रुपये वसूल केले आहेत. ED Said SBI Led Consortium Recovers Rs 792 Cr By Selling Shares Of Mallya Nirav Modi Choksi


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सांगितले की, स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) च्या नेतृत्वात कर्ज देणाऱ्या बँकांच्या गटाने विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या जप्त केलेल्या शेअर्सच्या विक्रीतून 792.11 कोटी रुपये वसूल केले आहेत.

    यामुळे बँकांकडून हजारो कोटी रुपये जमा करून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांना मोठा दणका बसला आहे. आता या तिघांच्या मालमत्तांच्या विक्रीतून एकूण वसुली 13,109.17 कोटींवर गेली आहे.

    18,170.02 कोटींची मालमत्ता जप्त

    गत महिन्यातच बँक घोटाळ्यातील आरोपी मल्ल्या, चोकसी आणि नीरव मोदी यांची 9371 कोटी रुपयांची संपत्ती सरकारी बँकांमध्ये वर्ग करण्यात आली. अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले आहे की, मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये (पीएमएलए) तीन प्रकरणांमध्ये 18,170.02 कोटी रुपयांची संपत्ती (बँकांना झालेल्या एकूण तोट्यापैकी 80.45 टक्के) संलग्न आहे. यासह 9371.17 कोटी रुपयांच्या संलग्न / जप्त मालमत्तेचा काही भाग सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि केंद्र सरकारकडे वर्ग करण्यात आला आहे.

    पीएनबी घोटाळ्यात सामील झालेल्या फरार हिरा व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांनी आणि मल्ल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कंपन्यांमार्फत निधी वळवून फसवणूक केली, आणि त्यामुळे बँकांना एकूण 22,585.83 कोटी रुपयांचे नुकसान झाले. दरम्यान, पीएमएलए कोर्टाने यापूर्वी फरार विजय मल्ल्याची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने विजय मल्ल्याची 5600 कोटींची मालमत्ता ताब्यात देण्याचे आदेश दिले होते, जी आतापर्यंत अंमलबजावणी संचालनालयाकडे होती.

    ED Said SBI Led Consortium Recovers Rs 792 Cr By Selling Shares Of Mallya Nirav Modi Choksi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य