वृत्तसंस्था
चंडीगड : पंजाब मध्ये वाळू माफिया आणि मुख्यमंत्र्यांचा भाचा भूपिंदरसिंग हनी याच्यावर सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने छापेमारी केली. ईडीची छापेमारी सध्या सुरू असून बऱ्याच बेकायदा व्यवहारांचा यातून पर्दाफाश होणे अपेक्षित आहे. ED raids Bhupinder Singh Honey, nephew of sand mafia chief minister in Punjab; The Chief Minister remembered Bengal
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना पश्चिम बंगालची आठवण झाली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बेकायदा वाळू उपसाचा जोरदार धंदा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाच्यावर अशाप्रकारे ईडीचे छापे पडल्याने काँग्रेस एक्स्पोज झाली आहे, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी वाळूमाफिया भूपिंदरसिंग हनी याच्याशी आपला संबंध नाकारला आहे. त्याचबरोबर निवडणुकीत अशी छापेमारी करणे हा प्रकार बंगालच्या निवडणूक किती घडला होता. परंतु त्याचा भाजपला काही फायदा झाला नाही, असा टोला चरणी सिंग चन्नी यांनी लगावला आहे.