• Download App
    दिल्ली दारू घोटाळा : दिल्ली, पंजाब, हैदराबादपर्यंत ईडीचे 35 ठिकाणी छापे; केजरीवालांची सिसोदियांना क्लिनचिटED raids at 35 locations in Delhi, Punjab, Hyderabad

    दिल्ली दारू घोटाळा : दिल्ली, पंजाब, हैदराबादपर्यंत ईडीचे 35 ठिकाणी छापे; केजरीवालांची सिसोदियांना क्लिनचिट

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी सक्तवसूली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी पुन्हा एकदा छापे सुरू केले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीसह हैदराबाद, पंजाबमध्ये 35 ठिकाणी छापे घातले आहेत. ED raids at 35 locations in Delhi, Punjab, Hyderabad

    यापूर्वी देखील ईडी आणि सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घराची आणि बँक लॉकरची झडती घेतली होती, तसेच विजय नायर आणि समीर महेंद्रू यांना दारू घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. मात्र, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदियांना क्लिनचिट दिली आहे.

    केंद्रीय तपास यंत्रणेला दिल्लीतील दारू घोटाळ्याचे आंध्र प्रदेश आणि पंजाबशीही संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता त्या ठिकाणीही छापे घालून पुरावे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समीर महेंद्रूच्या चौकशीत अनेक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. ईडीचे अधिकारी काही राजकीय नेते, दारू व्यावसायिक आणि माजी अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे घालत आहेत. एलजीच्या तक्रारीनंतर सीबीआयने दिल्लीतील मद्य धोरणातील घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीनेही याप्रकरणी तपास सुरू केला होता. या प्रकरणात तपास यंत्रणांनी मनीष सिसोदिया यांना मुख्य आरोपी बनवले आहे. सीबीआयने सिसोदिया यांच्या घरावर छापेमारी करत त्याच्या बँक लॉकरचीही झडती घेतली होती.

    – केजरीवालांची सिसोदियांना क्लिनचिट

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवार सकाळपासून सुरू झालेल्या ईडीच्या छाप्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल यांनी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना क्लीन चिट देऊन टाकली आहे. यासंदर्भात ट्विट करत केजरीवाल म्हणाले की, मनीष सिसोदिया यांच्या विरोधात पुरावे शोधण्यासाठी 500 हून अधिक छापे, 3 महिन्यांपासून 300 हून अधिक सीबीआय/ ईडीचे अधिकारी 24 तास काम करत आहेत. परंतु, त्यानंतरही मनीष सिसोदिया यांच्या विरोधात काहीही सापडले नाही. कारण त्यांनी काहीच गैर केले नाही. गलिच्छ राजकारणासाठी अनेक अधिकाऱ्यांचा वेळ वाया जात आहे. अशाने देशाची प्रगती कशी होणार?, असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.

    ED raids at 35 locations in Delhi, Punjab, Hyderabad

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!