प्रतिनिधी
नवी दिल्ली – महाराष्ट्रासह देशात राजकीय नेत्यांवर सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडी आणि इन्कम टॅक्सच्या कायदेशीर कारवाया जोरात सुरू असताना देशातील शैक्षणिक संस्था युनिव्हर्सल एज्युकेशन ग्रुपवर ईडी आणि इन्कम टॅक्सने छापे घातले आहेत.
युनिव्हर्लस एज्युकेशन ग्रुपचे प्रमुख जिसस लाल यांच्या घरी देखील इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी छापे घातले आहेत.ED – IT Raids on UNIVERSAL EDUCATION GROUP all over India
इन्कम टॅक्स चोरी आणि बेकायदेशीर कृत्य अशा संशयाखाली आयकर विभागाने हे छापे घालण्यात आले आहेत. युनिव्हर्सल एज्युकेशन ग्रुप ही देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून या संस्थेचे परदेशातही अनेक शाखा आहेत. देशात मुंबई शहरात 12 शाखा या शैक्षणिक संस्थेच्या आहेत तर बंगळुरू शहरात दोन शाखा, ठाण्यात एक शाखा, तामिळनाडू राज्यातील त्रिची या शहरात ३ शाखा, नाशिक शहरात 3 शाखा, औरंगाबाद शहरात 1 शाखा, वसई शहरात 2 शाखा, मिरा भाईंदर शहरात 1 शाखा, तर परदेशात दुबई येथे 1 शाखा आणि शारजाह येथे 1 शाखा या शैक्षणिक संस्थेच्या आहेत. यापैकी भारतातील सर्व शाखांवर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापे घातले आहेत.
युनिव्हर्सल एज्युकेशन ग्रुप या शैक्षणिक संस्थेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले आहेत. त्या संबंधी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला माहिती मिळून शाहनिशा केली असता संबंधित संस्थेने इन्कम टॅक्स चोरी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्यानंतर हे छापे घालण्यात आले आहेत. इतकेच नाही तर या प्रकरणात आता ईडीची देखील एन्ट्री झाली आहे