• Download App
    कसली मंदी? अडीच कोटी रुपयांची मर्सिडीझ-बेंझ लॉंचींग आधीच संपली The country’s largest luxury carmaker Mercedes-Benz today broke into the ultra-luxurious SUV segment with the introduction of the first-ever SUV in its Maybach range of vehicles. The Mercedes-Maybach GLS 600 4MATIC now sets a new benchmark altogether in the luxury SUV segment in India and is unmatched with its exquisite offerings.

    कसली मंदी? अडीच कोटी रुपयांची मर्सिडीझ-बेंझ लॉंचींग आधीच संपली

    गेल्या दोन वर्षांपासूनच्या कोरोना साथीमुळे आर्थिक मंदी असल्याचे सांगितले जाते. मात्र या संकटाच्या काळातही अलिशान वाहनांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या मर्सिडिज-बेंझ या जागतिक कंपनीने भारतात नवा विक्रम नोंदवला आहे. मर्सिडीझ-मेबॅच जीएलएस ६०० ४मॅटिक‘ बाजारपेठेत दाखल होण्याआधीच पन्नासपेक्षा जास्त कारचे बुकींग झाले. एवढेच नव्हे तर मर्सिडीझ-मेबॅच जीएलएस ६०० ४मॅटिक‘ चा पुढील सेट कस्टमाइज करून २०२२ च्या पहिल्या तिमाहीपर्यंत ग्राहकांना त्यांच्या कार सुपूर्द केल्या जातील असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. The country’s largest luxury carmaker Mercedes-Benz today broke into the ultra-luxurious SUV segment with the introduction of the first-ever SUV in its Maybach range of vehicles. The Mercedes-Maybach GLS 600 4MATIC now sets a new benchmark altogether in the luxury SUV segment in India and is unmatched with its exquisite offerings.


    विशेष प्रतिनिधी 

    पुणे : देशातील सर्वात मोठी लक्झरी गाड्यांची कंपनी मर्सिडीझ-बेंझने मेबॅच श्रेणीतील पहिल्या एसयुव्हीसोबत अल्ट्रा-लक्झरियस एसयुव्ही विभागात पाऊल ठेवले आहे. कंपनीने पहिल्या मेबॅच एसयुव्ही असण्याबरोबरीनेच जीएलएस मेबॅच ६०० हे भारतीय बाजारपेठेत उतरवण्याची तयारी केली आहे. मर्सिडीझ-मेबॅच एस-क्लासनंतरचे हे दुसरे मेबॅच मॉडेल आहे. या गाडीचा वेग ताशी अडीचशे किलोमीटर असा भन्नाट असणार आहे.

    ऑटोमोटीव्ह इंजिनीयरिंग, सेवा आणि ऍक्सेसरीजमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान, अनोखी लक्झरी आणि जास्तीत जास्त आराम यांचे दुसरे नाव म्हणजे मर्सिडीझ-मेबॅच ब्रँड असल्याची चर्चा वाहन विश्वात आहे. मर्सिडीझ-मेबॅच 600 मॅटिक या ब्रँडच्या गाडीला भारतीय ग्राहकांनी दिलेला प्रतिसादही विक्रमी ठरला आहे. एक्स-शोरुम किमामन किंमत 2.43 कोटी रुपये असणाऱ्या या अलिशान गाडीच्या सन 2021 मधले जे विक्री लक्ष्य कंपनीने निश्चित केले होते, त्या सगळ्या गाड्या प्रत्यक्ष लॉचिंगपूर्वीच विकल्या गेल्या आहेत.

    या विक्रमाबद्दल मर्सिडीझ-बेंझ इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ मार्टिन श्वेन्क यांनी सांगितले, “मर्सिडीझ-मेबॅच जीएलएस 600 4मॅटिक भारतात दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ही एसयुव्ही ग्राहकांना अविश्वसनीय अनुभव देते.  मर्सिडीझची पूर्वीची अभिजात मोहकता आणि सर्वाधिक आराम यांचा अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत मेळ घालत कारच्या लक्झरी अनुभवाची नवी व्याख्या या एसयुव्हीने सादर केली आहे.”

    श्वेन्क पुढे म्हणाले, “आमच्या उत्पादनांना खूप चांगली मागणी मिळत आहे. आता भारतात अनेक बाजारपेठा खुल्या होत आहेत आणि आम्ही देखील पुन्हा नव्याने सुरुवात करत आहोत. आम्हाला आशा आहे की मागणीमध्ये, खासकरून टॉप-एन्ड उत्पादनांच्या मागणीमध्ये अधिक जास्त वाढ होत राहील. सध्या बाजारपेठांमध्ये सकारात्मक वातावरण आहे आणि आम्ही पूर्ण उत्साहानिशी पुढे जात आहोत. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आम्ही आमच्या ग्राहकांसाठी अनेक नवी उत्पादने सादर करत राहू.”

    मर्सिडीझच्या नव्या एसयुव्हीची ही आहेत जबरदस्त वैशिष्ट्ये

    • ४३.५ अंशात रिक्लाईन आणि १२० एमएमपर्यंत पुश बॅक होऊ शकतात.
    • मेमरीसह इलेक्ट्रिकल ऍडजस्टमेन्ट, इलेकट्रीकली वाढवली जाऊ शकणारी लेग रेस्ट
    • रिअर कम्फर्ट पॅकेजची आधुनिक वैशिष्ट्ये, शोफर फंक्शन, क्लायमटाईज्ड आऊटर सीट्स
    • मसाज फंक्शनसोबत मल्टीकाँटूर सीट्स, वायरलेस चार्जिंग, एमबीयुएक्स रिअर टॅबलेट
    • प्री-सेफ®फंक्शन
    • पाठीमागील दोन फोल्डिंग टेबल्स फर्स्ट-क्लास रिअर सूटमध्ये बदल करून काम करण्यासाठी आरामशीर जागा तयार केली जाऊ शकते.
    • स्टोवेज ट्रेमध्ये नोटबुक्स किंवा कागदपत्रे ठेवली जाऊ शकतात.  शानदार वातावरणाला साजेसे दिसण्यासाठी त्यांना उच्च दर्जाच्या लेदरचे फिनिशिंग देण्यात आले आहे.

    रेफ्रिजरेटेड कम्पार्टमेन्ट*:

    रिअर आर्मरेस्टमध्ये रेफ्रिजरेटेड कम्पार्टमेन्ट व्यवस्थित सामावले गेले आहे.  यामध्ये हे पर्याय आहेत.

    •    इंटिरियर लायटिंग
    •    दोन शॅम्पेन फ्ल्यूटससाठी माउंटिंगचा पर्याय

     

    विशेष मेबॅच ड्राईव्ह प्रोग्राम:

    मर्सिडीझ-मेबॅचमध्ये एअरमॅटिक एअर सस्पेन्शन आणि अडॅपटिव्ह डम्पिंग सिस्टिम प्लस (एडीएस+) स्टॅंडर्ड म्हणून देण्यात आले आहे.  सस्पेन्शन आणि पॉवरट्रेनसाठी विशेष मेबॅच ड्राईव्ह प्रोग्राम पाठीमागील प्रवाशांना सर्वोत्तम आरामदायी प्रवासाचा आनंद मिळवून देतो.  स्टॅंडर्ड एमबीयुएक्स रिअर सीट टॅबलेट त्यांना पाठीमागील सीटवरूनच आराम आणि मनोरंजन फंक्शन्स अंतर्ज्ञानानुसार नियंत्रित केली जाण्याची सुविधा देते.

    ई-ऍक्टिव्ह बॉडी कंट्रोल*

    ई-ऍक्टिव्ह बॉडी कंट्रोल ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक चांगला बनवते, तसेच प्रवाशांना जाणवणारा वेगाचा प्रभाव कमीत कमी राखते. या कारमध्ये आराम आणि प्रभाव यांचा व अनोख्या ऑफ-रोड वैशिष्ट्यांसह मेळ साधला गेला आहे.  या कारमध्ये प्रवासी व ड्रायव्हर आधुनिक, संपूर्णपणे सक्रिय सस्पेन्शनच्या प्रथम श्रेणीच्या प्रभावाचा अनुभव घेतात, ज्यांना सर्व पीच, रोल आणि शॉक्स यांपासून वाचवण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे.

    The country’s largest luxury carmaker Mercedes-Benz today broke into the ultra-luxurious SUV segment with the introduction of the first-ever SUV in its Maybach range of vehicles. The Mercedes-Maybach GLS 600 4MATIC now sets a new benchmark altogether in the luxury SUV segment in India and is unmatched with its exquisite offerings.

    तंत्रज्ञान वैशिष्ट्ये: मर्सिडीझ-बेंझ जीएलएस ६०० ४मॅटिक
    इंजिन वी8
    डिस्प्लेसमेंट 3982 सीसी
    रेटेड आउटपुट 6000-6500 आरपीएम ला 410 केडब्ल्यू (557एचपी)
    इक्यू बूस्ट सहित अतिरिक्त आउटपुट 16 केडब्ल्यू (22एचपी)
    रेटेड टॉर्क 2500-4500 आरपीएम ला 730 एनएम
    इक्यू बूस्ट सहित अतिरिक्त टॉर्क 250 एनएम
    अक्सेलरेशन 0-100 किमी/तास 4.9एस
    सर्वात जास्त वेग 250 किमी/तास
    लांबी/रुंदी/उंची (एमएम) 5205/2030/1838
    व्हीलबेस (एमएम) 3135

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…