• Download App
    वादळापूर्वी कच्छला भूकंपाचा धक्का, ‘बिपरजॉय’च्या संकटाअगोदर गुजरातमध्ये अलर्ट जारी! Earthquake shock in Kutch before the storm alert issued in Gujarat before the crisis of Biparjoy

    वादळापूर्वी कच्छला भूकंपाचा धक्का, ‘बिपरजॉय’च्या संकटाअगोदर गुजरातमध्ये अलर्ट जारी!

    एनडीआरएफच्या १७ तुकड्या तैनात; हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ‘बिपरजॉय’ वादळाच्या संकटाचा इशारा देत गुजरामधील कच्छमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३.५ इतकी होती. बुधवारी सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी या भूकंपाचे धक्के जाणवले. Earthquake shock in Kutch before the storm alert issued in Gujarat before the crisis of Biparjoy

    तत्पूर्वी, दुपारी ४.१५ वाजता जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड भागातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता ३.४ इतकी होती. याआधी मंगळवारी दुपारीही राजधानी दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. मंगळवारी भारत, पाकिस्तान आणि चीनमध्ये या भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्ली-एनसीआर, जम्मू काश्मीर, चंदीगडसह भारतातील अनेक शहरांमध्ये भूकंपाचा प्रभाव जाणवला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.४ इतकी मोजली गेली.

    मंगळवारी पहाटे १.३३ वाजता हा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे होता. त्याची खोली जमिनीच्या आत ६ किलोमीटर होती. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.४ इतकी होती.

    चक्रीवादळ हा गुजरातसाठी चिंतेचा विषय –

    सध्या भूकंपासोबतच चक्रीवादळ बिपरजॉय देखील गुजरातसाठी चिंतेचा विषय आहे. बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र झाल्यानंतर आता गुजरातकडे येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ उद्या (गुरुवार) १५ जून रोजी राज्यात धडकणार आहे. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफच्या १७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये कच्छमध्ये ४, द्वारका आणि राजकोटमध्ये प्रत्येकी तीन, जामनगरमध्ये दोन आणि पोरबंदरमध्ये एक टीम तैनात करण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातमधील पोरबंदर आणि द्वारकाच्या समुद्र किनाऱ्यावरून जाऊ शकते.

    Earthquake shock in Kutch before the storm alert issued in Gujarat before the crisis of Biparjoy

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती