भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानचा हिंदुकुश पर्वत होता.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर मध्ये शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.8 इतकी मोजली गेली. भूकंपाच्या धक्क्याने घाबरलेले लोक घराबाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचले. प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानचा हिंदुकुश पर्वत होता. Earthquake in Delhi NCR people run out of their houses in fear
भूकंपाचे धक्के केवळ दिल्ली-एनसीआरमध्येच नाही तर जम्मू-काश्मीर, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या काही भागातही जाणवले. मात्र, आतापर्यंत कुठेही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
पृथ्वी चार थरांनी बनलेली आहे. आतील गाभा, बाह्य गाभा, आवरण आणि कवच. कवच आणि वरच्या आवरणाच्या गाभ्याला लिथोस्फीअर म्हणतात. हा 50 किलोमीटर जाडीचा थर टेक्टोनिक प्लेट्स नावाच्या अनेक खंडांमध्ये विभागलेला आहे. पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत, ज्या सतत फिरत राहतात. जेव्हा या प्लेट्स जास्त हलतात तेव्हा भूकंप जाणवतो.
Earthquake in Delhi NCR people run out of their houses in fear
महत्वाच्या बातम्या
- जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ३ जवान शहीद, लष्कराचे सर्च ऑपरेशन सुरू
- राहुल गांधी कायद्याच्या नजरेत दोषीच, फक्त शिक्षेला स्थगिती दिल्याने ते संसदेत येऊ शकतात; महेश जेठमलानींनी मांडली वस्तूस्थिती!!
- २०३० पर्यंत देशात ८०० ‘वंदे भारत’ ट्रेन धावतील, आर के सिंह यांनी सांगितली सरकारची योजना
- आयुष्यातलं सगळ्यात पहिलं नाटक पाहून सैराट फेम रिंकू भावुक, डोळ्यात पाणी आणि मी स्तब्ध असं म्हणत शेअर केल्या भावना