वृत्तसंस्था
अयोध्या : श्री राम लल्लांच्या अयोध्येत ऐतिहासिक दीपोत्सवात प्रचंड उत्साह दिसून येत आहे. नऊ लाख दीपांनी अयोध्या उजळली जात आहे. या दीपोत्सवात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेश संपूर्ण मंत्रिमंडळ श्री राम लल्लांच्या चरणी हजर आहे.During the next car service, bullets will not rain on Ram devotees and Krishna devotees, but there will be showers of flowers
यावेळी बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील कारसेवेच्या आठवणी जागविल्या. ते म्हणाले, की आजपासून 31 वर्षांपूर्वी 2 नोव्हेंबर 1990 रोजी अयोध्येमध्ये राम भक्तांवर गोळ्या चालविण्यात आल्या होत्या. लाठीमार करण्यात आला होता.
पण उत्तर प्रदेशातल्या जनतेने लोकशाहीची खरी ताकद दाखवून दिली आणि ज्यांनी भक्तांवर गोळ्या चालविल्या ते जनतेच्या ताकदीपुढे आज झुकून उभे आहेत. जनतेने अशीच ताकद दाखविली तर पुढच्या कारसेवेच्या वेळी कारसेवकांवर गोळ्या चालविणाऱ्या परिवारातले लोक कार सेवेसाठी रांगेत उभे असलेले दिसतील.
इथून पुढे जेव्हा कारसेवा होईल तेव्हा कारसेवकांवर गोळ्या चालविल्या जाणार नाही तर पुष्पवर्षाव केला जाईल, असे गौरवोद्गार योगी आदित्यनाथ यांनी काढले. या दीपोत्सवत अयोध्येत सर्व संत मंडळी जमली आहेत. आयोध्येत अभूतपूर्व उत्साह ओसंडून वाहत आहे आणि त्याच वेळी पुढच्या कारसेवेसंदर्भात म्हणजे कृष्ण जन्मभूमीवरील कारसेवेसंदर्भात योगी आदित्यनाथ यांनी घोषणा करून तिची जणू सुरुवातच करून दिली आहे.
During the next car service, bullets will not rain on Ram devotees and Krishna devotees, but there will be showers of flowers
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान