• Download App
    कर्नाटकातल्या नेतृत्वबदलाबद्दल मला काही माहिती नाही; पंतप्रधानांच्या भेटीनंतर येडियुरप्पांची प्रतिक्रिया During my discussion with PM Modi, I requested him to permit to carry out development works in the State

    कर्नाटकातल्या नेतृत्वबदलाबद्दल मला काही माहिती नाही; पंतप्रधानांच्या भेटीनंतर येडियुरप्पांची प्रतिक्रिया

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – उत्तराखंडानंतर कर्नाटकात भाजप नेतृत्वबदल करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. पण त्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आज पूर्णविराम लावला. कर्नाटकातल्या नेतृत्वबदला विषयी मला काही माहिती नाही. ते तुम्हीच सांगा. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फक्त कर्नाटकातल्या विकास प्रकल्पांच्या परवानगी मागण्यासाठी गेलो होतो, असा खुलासा येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतला आहे. During my discussion with PM Modi, I requested him to permit to carry out development works in the State

    त्यांनी कर्नाटकातील विकास कामांबद्दल सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. बाकी नेतृत्वबदलाबद्दल मला काहीही माहिती नाही, ते तुम्हीच सांगा, असे उत्तर येडियुरप्पा यांनी मोदींच्या भेटीनंतर पत्रकारांना दिले.

    तत्पूर्वी, बेंगळुरू येथे बोलताना येडियुरप्पा म्हणाले की, त्यांच्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांशी झालेल्या बैठकीनंतर या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात येईल. मी पंतप्रधानांशी बोलण्यासाठी आणि राज्याच्या विकास, सिंचन प्रकल्प आणि इतर विषयांवर अनेक केंद्रीय मंत्र्यांची भेट घेण्यासाठी दिल्ली येथे जात आहे.

    मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत विचारले असता ते म्हणाले की, “माझ्यासमोर असा कोणताही प्रस्ताव नाही, चर्चेनंतर पाहूया.” मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाबाबत होणाऱ्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर येडियुरप्पा म्हणाले की, अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. हे मुख्यमंत्र्यांच्या विवेकबुद्धीवर अवलंबून असल्याचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी बुधवारी सांगितले होते.

    During my discussion with PM Modi, I requested him to permit to carry out development works in the State

    Related posts

    Election Commission : निवडणूक आयोगाने एकाच वेळी घेतले तीन निर्णय!

    PM Modi : पंतप्रधान मोदींनी केरळमधून ८९०० कोटी खर्चून बांधलेल्या विझिंजम बंदराची दिली भेट

    Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधान म्हणाले- राहुल गांधींना गांभीर्याने घेऊ नका; त्यांना सर्वेक्षण आणि सेन्ससमधील फरक माहीत नाही

    Icon News Hub