• Download App
    दक्षिण आफ्रिकेत लसीकरणामुळे ओमिक्रॉनचा संसर्ग केवळ पन्नास दिवसांमध्ये आला नियंत्रणात । due to vaccination in South Africa The Omicron infection got under control in just fifty days

    दक्षिण आफ्रिकेत लसीकरणामुळे ओमिक्रॉनचा संसर्ग केवळ पन्नास दिवसांमध्ये आला नियंत्रणात

    वृत्तसंस्था

    जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा संसर्ग केवळ ५० दिवसांत नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. तेथे लसीकरण मोहीम वेगाने राबविल्याने ओमिक्रॉन नियंत्रणात आल्याचा दावा करण्यात आला आहे. due to vaccination in South Africa The Omicron infection got under control in just fifty days

    कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियटने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. ओमिक्रॉनचा सर्वात मोठा प्रादुर्भाव दक्षिण आफ्रिकेवर होता. सर्वात पहिल्यांदा ओमिक्रॉनचे रूग्ण आढळून आले होते. परंतु ५० दिवसांमध्ये ओमिक्रॉन रूग्णांवर नियंत्रण ठेवण्यास अखेर त्यांना यश आलं आहे.



    वैद्यकीय तज्ञांचं मत

    एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की, ओमिक्रॉन धोकादायक नाही.ओमिक्रॉन फुफ्फुसांवर नव्हे तर श्वसनमार्गावर परिणाम करतो. श्वसनलिकेतील अँटीबॉडीज त्यास कमकुवत करतात, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे. रुग्णाला ऑक्सिजन लावण्याची गरजच भासत नाही.

    संचारबंदी हटविली; निर्बंधही मागे

    दक्षिण आफ्रिकेने ओमिक्रॉनच्या लाटेवर नियंत्रण मिळवलं आहे. रात्रीची संचारबंदी तत्काळ हटवली असून निर्बंधही मागे घेण्यास सुरुवात केली. रात्री ११ नंतर दारूची दुकाने उघडण्यास बंदी घातली आहे. लसीकरणावर भर दिला. त्यामुळे ओमीक्रोनवर नियंत्रण मिळवण्यास मोठी मदत झाली आहे.

    due to vaccination in South Africa The Omicron infection got under control in just fifty days

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य