वृत्तसंस्था
नागपूर : मेट्रोसाठी अॅल्युमिनियम कोचच्या निर्मितीमुळे मेक इन इंडियाचे स्वप्न साकार होत आहे. मेट्रोसाठी अॅल्युमिनियम कोच पुण्याकडे रवाना देखील करण्यात आले आहेत. Due to the manufacture of Aluminium coaches for the metro Make in India dream come true: Departure for Pune
अॅल्युमिनियमपासून निर्मित पहिली मेट्रो ट्रेन पुणे येथील प्रकल्पाकरिता शनिवारी रवाना केली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारच्या अॅल्युमिनियम कोचचे निर्माण होत आहे.
कोलकातामधील उत्तरपरा येथे टिटागड वॅगन्स या कंपनीतर्फे आयोजित सोहळ्यात केंद्रीय गृहनिर्माण व नगर विकास मंत्रालयाचे सचिव आणि महामेट्रोचे अध्यक्ष मनोज जोशी यांनी हिरवा झेंडा दाखवत ट्रेन पुणे मेट्रो प्रकल्पाकरिता रवानगी केली. याप्रसंगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी जयदीप, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर उपस्थित होते. मनोज जोशी म्हणाले, ‘मेट्रो प्रकल्पांमुळे एक नवीन इको-सिस्टीम निर्मित होत आहे. अॅल्युमिनियम कोचच्या निर्मितीमुळे यापुढे मेक इन इंडियाचे स्वप्न साकार होत आहे. ‘
डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, ‘वजनाने हलक्या असलेला मेट्रोच्या कोचचे निर्माण होणे आणि त्याचा मेट्रो प्रकल्पाकरता वापर होणे ही संपूर्ण देशाकरता अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.
अॅल्युमिनियम कोचची वैशिष्ट्ये
- इतर कोचपेक्षा वजन ६.५ टक्क्यांनी कमी
- पुणे मेट्रोकरिता ३४ मेट्रो ट्रेनचा ऑर्डर.
- प्रत्येक ट्रेनला ३ कोच असतील
- पुणे मेट्रोकरिता १०२ कोचची पूर्ती टिटागढ वॅगन्स करणार.
- कोचची लांबी २९ मीटर आणि उंची ११.३० मीटर
- कोचची रुंदी २.९ मीटर.
- प्रतिकोच आसनक्षमता ३२०.
Due to the manufacture of Aluminium coaches for the metro Make in India dream come true: Departure for Pune
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारताचा दुर्मिळ ठेवा मायदेशी; अनमोल मूर्ती, ऐतिहासिक वारसा मिळाला
- कोरोना बाधित रुग्ण वेगाने बरे होत आहेत
- हिजाब घालून चक्क वर्गात नमाज; मध्यप्रदेशातील कॉलेजमधील घटना; घरी धर्म पाळण्याचे आदेश
- भारतातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू; तब्बल दोन वर्षांनी सुरू झाल्याने पर्यटक प्रवासी सुखावले
- आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ
- काँग्रेस बळकट व्हायला हवी, लोकशाहीसाठी विरोधी पक्ष राहायला हवा अशी नितीन गडकरी यांची अपेक्षा