वृत्तसंस्था
कीव : रशियन फौजांच्या आक्रमाणामुळे लाखांहून अधिक नागरिक जीव वाचविण्यासाठी युक्रेनमधून पळून गेले आहेत. गेल्या दहा दिवसांतील हे भयानक वास्तव समोर आले आहे. Due to the invasion of Russian forces millions of civilians leaves Ukraine
रशियाने युक्रेन ताब्यात घेण्यासाठी आक्रमक कारवाई करतानाअण्वस्त्र सज्ज ठेवल्याने अनेकांचे धाबे दणाणले असून युरोप आणि अमेरिकाही रशियावर आक्रमक कारवाई करण्यापूर्वी विचार करू लागले आहेत. या युद्धाचे जागतिक परिणाम होऊन त्याचे तिसऱ्या महायुध्दात रूपांतर होण्याची धास्ती निर्माण झाली आहे.
नागरिकांचे जलदगतीने झालेले स्थलांतर अ्सल्याचे संयुक्त राष्ट्रांनी गुरुवारी सांगितले. दरम्यान, रशियन फौजांनी युक्रेनमधील दुसऱ्या मोठ्या शहरावरील आणि दोन बंदरांवरील हल्ले वाढवले आहेत.
निर्वासितांची ही संख्या लक्षात घेता, युक्रेनच्या लोकसंख्येपैकी २ टक्क्यांहून अधिक लोक सात दिवसांत देशाबाहेर पडणे भाग पडले आहे. हे सामूहिक स्थलांतर सुमारे १५ लाख लोकसंख्येच्या खारकिव्ह शहरात नजरेला पडत होते. तोफगोळे आणि बॉम्ब यांच्यापासून बचावासाठी नागरिकांनी शहरातील रेल्वे स्थानकावर गर्दी केली आणि गाडय़ांमध्ये प्रवेश मिळवला. त्यापैकी बहुतेकांना आपल्याला कुठे जायचे आहे हे ठाऊक नव्हते.
Due to the invasion of Russian forces millions of civilians leaves Ukraine
महत्त्वाच्या बातम्या
- विराट कोहली १०० कसोटी खेळणारा १२ वा क्रिकेटपटू
- यू ट्यूबवरून भारतीयांना कमाविले ६८०० कोटी रुपये, पाच वर्षांत युट्यूबमुळे मिळाल्या पावणेसात लाख नोकऱ्या
- फ्रान्समध्ये न्यायालयात महिला वकिलांना हिजाब परिधान करण्यास बंदी
- आम्ही रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना युद्ध थांबवण्यास सांगू शकतो का? असे सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांचा सवाल
- मला कसले काळे झेंडे दाखविता, निकम्म्या अधिकाऱ्यांना दाखवा, नितीन गडकरी यांनी सुनावले