• Download App
    गुजरातच्या मुंद्रा बंदरात पकडलेल्या अंमली पदार्थांचे आंध्रातील विजयवाडाशी कनेक्शन ; किंमत २० हजार ९०० कोटी रुपये|Drugs seized at Mundra port in Gujarat Connection to Vijayawada in Andhra; Price Rs 20,900 crore

    गुजरातच्या मुंद्रा बंदरात पकडलेल्या अंमली पदार्थांचे आंध्रातील विजयवाडाशी कनेक्शन ; किंमत २० हजार ९०० कोटी रुपये

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : गुजरातच्या मुंद्रा बंदरात पकडलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थाचा (हेरॉईन) संबध हा आंध्रप्रदेशातील विजयवाडाशी असल्याचे उघड झाले आहे. या अंमली पदार्थांची किंमत २० हजार ९०० कोटी रुपये आहे.Drugs seized at Mundra port in Gujarat Connection to Vijayawada in Andhra; Price Rs 20,900 crore

    अफगाणिस्तानातील कंदहारमधील हसन हुसेन लिमिटेडमधून ‘टॅल्कम पावडर’च्या नावाखाली हे अंमली पदार्थ आयात केले होते, असा आरोप विजयवाडा येथील कंपनीवर आहे. त्यांनी हेरॉईनची तस्करी केल्याचा आरोप आहे डीआरआयने जप्त केलेल्या अंमली पदार्थांची ही सर्वात मोठी खेप आहे. ज्याची किंमत ३० हजार ९०० कोटी रुपये आहे.



     

    गुजरातच्या मुंद्रा बंदरात जप्त केलेले हेरॉईनची हे अफगाणिस्तानातील कंदहार येथून इराणला आणि इराणच्या अब्बास बंदरातून गुजरात येथील मुंद्रा बंदरात टाल्कम पावडर असल्याचे सांगून आणले गेले होते. जवळजवळ 3 हजार किलो अंमली पदार्थांची तस्करी केली गेली असून ती जगातील सर्वात मोठे रॅकेट उघड झाले आहे. याचा संबंध विजयवाडाशी आहे.

    वास्तविक, जप्त केलेला माल विजयवाडाच्या आशी ट्रेडिंग कंपनीच्या आयात केलेल्या पॅकेजमध्ये लपवण्यात आला होता. ही कंपनी अफगाणिस्तानातून टाल्कम दगड आयात करते. इराण बंदरातून ते गुजरातमधील मुंद्रा बंदरात पाठवण्यात येतात असा दावा करते. कंदहारमधील हसन हुसेन लिमिटेडमधून आयात केलेल्या अंमली पदार्थ हे ‘टॅल्कम पावडर’च्या नावाने तस्करी केल्याचा आरोप आहे. डीआरआयने जप्त केलेली ही सर्वात मोठी खेप आहे.

    Drugs seized at Mundra port in Gujarat Connection to Vijayawada in Andhra; Price Rs 20,900 crore

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते