• Download App
    Droupadi Murmu Profile : कोण आहेत द्रौपदी मुर्मू? पतीच्या निधनानंतर 2 मुलेही गमावली, शिक्षिका झाल्या; नंतर पाटबंधारे विभागात लिपिक म्हणून काम|Droupadi Murmu Profile Who is Draupadi Murmu? She also lost 2 children after her husband’s death, became a teacher; Later worked as a clerk in the irrigation department

    Droupadi Murmu Profile : कोण आहेत द्रौपदी मुर्मू? पतीच्या निधनानंतर 2 मुलेही गमावली, शिक्षिका झाल्या; नंतर पाटबंधारे विभागात लिपिक म्हणून काम

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) वतीने यावेळी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुर्मू यांचे नाव पहिल्यांदाच समोर आले नसून 2017च्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही झारखंडच्या तत्कालीन राज्यपाल म्हणजेच द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची चर्चा जोरात होती. मात्र, त्यादरम्यान रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि त्यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली.Droupadi Murmu Profile Who is Draupadi Murmu? She also lost 2 children after her husband’s death, became a teacher; Later worked as a clerk in the irrigation department

    आता भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत सुमारे 20 नावांवर चर्चा झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांच्या नावावर एक मत तयार करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीत यश मिळाल्यास एकेकाळी लिपिक म्हणून काम केलेल्या मुर्मू या आदिवासी महिला पहिल्यांदाच रायसीना हिलच्या पायऱ्या चढतील.



    देशाला मिळणार पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती; द्रौपदी मुर्मू यांना एनडीएची उमेदवारी!!; कोण आहेत त्या??
    कोण आहेत द्रौपदी मुर्मू?

    द्रौपदी मुर्मूंचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे. त्या आदिवासी संथाल कुटुंबातील आहे.

    द्रौपदी मुर्मूंचा विवाह श्याम चरण मुर्मू यांच्याशी झाला होता. या जोडप्याला दोन मुलगे आणि एक मुलगी होती. पण काही काळातच त्यांचे पती आणि दोन्ही मुलांचे निधन झाले.

    मुर्मू यांनी घर चालवण्यासाठी आणि आपल्या मुलीला शिक्षण देण्यासाठी शिक्षक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी ओडिशाच्या पाटबंधारे विभागात कनिष्ठ सहायक म्हणजेच लिपिक म्हणूनही काम केले.

    आईने नोकरीतून मिळालेल्या पगारातून घरखर्च भागवला आणि मुलीला शिकवले. मुलीलाही कॉलेजनंतर बँकेत नोकरी लागली. इति मुर्मू सध्या रांचीमध्ये राहतात आणि त्यांचा विवाह झारखंडच्या गणेश यांच्यासोबत झाला आहे. दोघांनाही आद्यश्री नावाची एक मुलगी आहे.

    द्रौपदी मुर्मू यांनी 1997 मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवकपदाची निवडणूक जिंकून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

    त्यांनी भाजप अनुसूचित जमाती मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. यासोबतच त्या भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या होत्या.

    द्रौपदी मुर्मू 2000 आणि 2009 मध्ये ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर दोनदा आमदार झाल्या.

    ओडिशात द्रौपदी मुर्मू यांना नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दल आणि भाजप युती सरकारमध्ये 2000 ते 2004 दरम्यान वाणिज्य, वाहतूक आणि नंतर मत्स्य आणि प्राणी संसाधन खात्यात मंत्री करण्यात आले.

    द्रौपदी मुर्मू यांना मे 2015 मध्ये झारखंडच्या 9व्या राज्यपाल बनवण्यात आले होते. त्यांनी सय्यद अहमद यांची जागा घेतली होती. झारखंड उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश वीरेंद्र सिंह यांनी द्रौपदी मुर्मू यांना पदाची शपथ दिली.

    झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल होण्याचा मानही द्रौपदी मुर्मू यांच्याकडेच गेला. तसेच, कोणत्याही भारतीय राज्याच्या राज्यपाल झालेल्या त्या पहिल्या आदिवासी आहेत.

    जर द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपती बनल्या तर त्या देशाच्या राष्ट्रपती बनणाऱ्या ओडिशातील दुसऱ्या व्यक्ती असतील. द्रौपदी मुर्मूच्या आधी ओडिशाचे व्हीव्ही गिरी देशाचे राष्ट्रपती राहिले आहेत.

    राष्ट्रपती निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार असून मतमोजणी 21 जुलै रोजी होणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे.

    Droupadi Murmu Profile Who is Draupadi Murmu? She also lost 2 children after her husband’s death, became a teacher; Later worked as a clerk in the irrigation department

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Acharya Pramod Krishnam : पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुर्शिदाबाद हिंसाचाराची दखल घ्यावी – आचार्य प्रमोद कृष्णम

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के