विशेष प्रतिनिधी
हैद्राबाद : दुर्गम भागात ड्रोनद्वारे औषध आणि लसपुरवठा करण्यास देशात सुरूवात होणार आहे. तेलंगणामध्ये या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते झाले.Drone to supply medicine and corona vaccine, pilot project in Telangana by Jyotiraditya Shinde
अत्यंत दुर्गम भागात या ड्रोनद्वारे लस आणि औषध पुरविण्यात येणार आहेत. यावेळी तेलंगणाचे मंत्री के. टी. रामारावही उपस्थित होते. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, आजचा दिवस केवळ तेलंगणाच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अतिशय क्रांतिकारी दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ड्रोन धोरण तयार करण्यात आले आहे.
तीन महिन्यांनंतर याचं विश्लेषण केले जाईल. त्यानंतर विमान मंत्रालय, आयटी मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, राज्य सरकार आणि केंद्र मिळून संपूर्ण देशासाठी एक मॉडेल तयार करतील.पायलट प्रोजेक्ट म्हणून ही योजना तेलंगणाच्या १६ ग्रीन झोनमध्ये सुरू करण्यात आली आहे. नंतर ही योजना संपूर्ण देशात सुरू केली जाणार आहे.
विमानतळ, धोरण आणि सुधारणांशी संबंधित १६ मुद्यांचा समावेश असलेला १०० दिवसांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. एअर टॅक्सी आणि स्काय टॅक्सी हे देशाचे भविष्य आहे. २०३० पर्यंत भारत ड्रोनची राजधानी होईल अशी अपेक्षाही शिंदे यांनी व्यक्त केली.
Drone to supply medicine and corona vaccine, pilot project in Telangana by Jyotiraditya Shinde
महत्त्वाच्या बातम्या
- गणेशोत्सवाला प्रतिकूल दिलेले “बड्यांचे” अभिप्राय नंतर लोकमान्यांचे आणि गणेशोत्सवाचे ठरले भूषण…!!
- उत्तराखंड, गुजरातचे मुख्यमंत्री बदलले भाजपने; स्वतःकडे श्रेय घेतले आम आदमी पार्टीने…!!
- उत्तर महाराष्ट्राशी सापत्नभाव; पूरग्रस्तांच्या निधीवरून छगन भुजबळ – सुहास कांदे भर बैठकीत खडाजंगी; पण राजकीय वैर जुनेच!!
- CONGRESS VS NCP : कॉंग्रेस होती आता नाही- ‘काँग्रेस ‘त्या’ जमीनदारासारखी’ शरद पवारांच्या विधानावर स्मृती इराणींनी घेतली डबल फिरकी ….