विशेष प्रतिनिधी
अबुधाबी : संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये मोठा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अबूधाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात सोमवारी तीन मोठे स्फोट झाले. ड्रोनच्या माध्यमातून हे हल्ले करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या हल्ल्यांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. मृतांमध्ये दोन भारतीय आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. याशिवाय अन्य सहा जण जखमी झाल्याची बाबही समोर आली आहे.Drone bomb attack on UAE airport 3 Major blasts; two indians one pakistani killed
स्फोटांनंतर विमानतळावरही आगीचे लोळ दिसून आले. तथापि, UAE तपास सुरू करण्यापूर्वी, इराण समर्थित हूती बंडखोरांनी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. या संघटनेने युएईवर हल्ले करणार असल्याचे निवेदन जारी केले आहे. स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी (ADNOC) च्या पेट्रोल वाहून नेणाऱ्या टँकरमध्ये विमानतळावर हा स्फोट झाला.
प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की टँकरला आग लागण्यापूर्वीच आकाशात ड्रोनसारखी आकृती दिसली होती ती दोन वेगवेगळ्या भागात पडली होती. विमानतळावरील आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आणि अधिकाऱ्यांचे पथक पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हूती प्रवक्ते याह्या सारी यांच्याशी जोडलेल्या एका ट्विटर खात्याने असा दावा केला आहे की येत्या काही तासांत हूती युएईवर लष्करी कारवाई करेल. विशेष म्हणजे, संयुक्त अरब अमिराती दीर्घकाळापासून येमेनमधील गृहयुद्धाचा भाग आहे.
2015 मध्ये UAE ने अरब युतीचा एक भाग म्हणून येमेनमध्ये सरकार बदलण्यासाठी हूती बंडखोरांविरुद्ध मोहीम सुरू केली. तथापि, 2019 पासून येमेनमधील UAE हालचाली कमी झाल्या आहेत. गेल्या वर्षी सौदी अरेबियाच्या विमानतळाला लक्ष्य करण्यात आले होते
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, हूती बंडखोरांनी दक्षिण सौदी अरेबियातील विमानतळावर ड्रोनने हल्ला केला होता. त्यामुळे एका नागरी विमानाला आग लागली. याशिवाय, ऑगस्ट 2021 मध्ये, हूतींनी आणखी एका सौदी विमानतळाला लक्ष्य केले. हूती बंडखोरांनी यापूर्वी सौदी विमानतळांना लक्ष्य केले आहे. पण UAE मधील विमानतळावर मोठ्या हूती हल्ल्याची ही पहिलीच घटना आहे.
Drone bomb attack on UAE airport 3 Major blasts; two indians one pakistani killed
महत्त्वाच्या बातम्या
- PM Security Breach : शीख फॉर जस्टिसकडून पंतप्रधानांचा ताफा पुन्हा रोखण्याची धमकी, वकिलांना फोन, चौकशी समितीला काम न करण्याचा इशारा
- Punjab Election Date Changed : पंजाबमध्ये निवडणुकीची तारीख बदलली, आता या दिवशी होणार मतदान
- ‘शेकाप’चे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचं कोल्हापुरात निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- OBC Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशचे राजकारण पुन्हा तापले
- Kiran Mane Controversy : सेटवरील महिलांशी गैरवर्तनामुळे किरण मानेंची हकालपट्टी, राजकारणाचा काही संबंध नाही, चॅनलने दिले स्पष्टीकरण