• Download App
    मंगळावर ३० सेकंदाच्या उड्डाणासाठी ३५ वर्षांचा अनुभव पणाला लावणारे डॉ. जे. बॉब बालाराम, नासातील भारतीय शास्त्रज्ञाच्या जिद्दीची कहाणी Dr. who has 35 years of experience for a 30-second flight on Mars. The story of Bob Balaram, the stubborn Indian scientist at NASA

    मंगळावर ३० सेकंदाच्या उड्डाणासाठी ३५ वर्षांचा अनुभव पणाला लावणारे डॉ. जे. बॉब बालाराम, नासातील भारतीय शास्त्रज्ञाच्या जिद्दीची कहाणी

    अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने मंगळ ग्रहावर पहिल्यांदा इंजिन्युटी हेलिकॉप्टर उतरवून इतिहास रचला. हेलिकॉप्टरने केवळ ३० सेकंद उड्डाण केले मात्र त्यासाठी मला माझा ३५ वर्षांचा अनुभव पणाला लावला असे म्हणणारे नासाचे प्रमुख इंजिनिअर जे. बॉब बालाराम यांच्या जिद्दीची कहाणी प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारी ठरणार आहे. Dr. who has 35 years of experience for a 30-second flight on Mars. The story of Bob Balaram, the stubborn Indian scientist at NASA


    विशेष प्रतिनिधी

    न्यूयॉर्क : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने मंगळ ग्रहावर पहिल्यांदा इंजिन्युटी हेलिकॉप्टर उतरवून इतिहास रचला. हेलिकॉप्टरने केवळ ३० सेकंद उड्डाण केले मात्र त्यासाठी मला माझा ३५ वर्षांचा अनुभव पणाला लावला असे म्हणणारे नासाचे प्रमुख इंजिनिअर जे. बॉब बालाराम यांच्या जिद्दीची कहाणी प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारी ठरणार आहे.

    पृथ्वीवरून नियंत्रित होणारं हेलिकॉप्टर किंवा रोटरक्राफ्ट मंगळावर उतरवण्याच्या संपूर्ण मोहिमेत बालाराम या भारतीय शास्त्रज्ञानं महत्त्वाची भूमिका बजावली. नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबमध्ये काम करणाºया बालाराम यांचे या मोहिमेत सर्वाधिक योगदान आहे. बालाराम यांचा जन्म दक्षिण भारतातील असून लहानपणापासूनच त्यांना लहानपणापासूनच त्यांना अंतराळ विज्ञान आणि रॉकेट यामध्ये रस होता. चंद्रावर नील आर्मस्ट्राँग यांनी पहिलं पाऊल ठेवलं. ही बातमी बालाराम यांनी रेडिओवर ऐकली. तो दिवस आजही बालाराम यांच्या स्मरणात आहे.



    बालाराम लहान असताना त्यांच्या काकांनी अमेरिकन दूतावासाला पत्र लिहून नासा आणि अंतराळाबद्दलची माहिती मागवली होती. एका लिफाफ्याच्या माध्यमातून दूतावासानं ही माहिती बालाराम यांच्या काकांना पाठवली. ती माहिती वाचून बालाराम यांना अतिशय आनंद झाला होता आणि तेव्हापासूनच त्यांनी नासामध्ये जाण्याचे स्वप्न पाहायला सुरूवात केली होती.

    चार पौंड म्हणजे केवळ १.८ किलोग्रॅम वजनाचे हे रोटोरक्रॅप्ट मंगळावरून दहा फुट उंच उडाले. केवळ ३९.१ सेकंद ते वायुमंडळात होते. त्याचे फोटो सुमारे २७८० लाख किलोमीटर दूर असलेल्या नासामध्ये आले. या सगळ्या मोहीमेचे सारथ्य बालाराम यांनी केले होते.

    मंगळ ग्रहावर इंजिन्युटी हेलिकॉप्टरनं केवळ ३० सेकंदांसाठीच का उड्डाण केलं, असा प्रश्न बालाराम यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला बालाराम यांनी उत्तर दिलं. ३० सेकंद उड्डाण केल्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा मंगळाच्या पृष्ठभूमीवर स्थिरावलं. मंगळाच्या वायूमंडळात कोणत्याही वस्तूचं लँडिंग करणं आणि तिचं उड्डाण करणं कठीण आहे. कारण तिथलं वायूमंडळ अतिशय हलकं आहे. त्यामुळे ३० सेकंदांसाठीच्या उड्डाणासाठी मला माझा ३५ वर्षांचा अनुभव पणाला लावावा लागला.

    मंगळावर हेलिकॉप्टर उडविण्याची मोहिम राबविताना बालाराम यांना अनेकांनी वेड्यात काढले होते. परंतु, त्यांनी जिद्द सोडली नाही. कारण विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे या इंजिन्युटी हेलिकॉप्टरसोबत त्यांनी एक छोटा कापडाचा तुकडाही होता. त्याचे विशेष म्हणजे १९०३ मध्ये राईट बंधुंनी बनविलेल्या पहिल्या विमानाच्या एका पंख्यावर तो बांधला होता. मानवी इतिहासातील मंगळावरच्या यशस्वी हेलिकॉप्टर उड्डाणात हा कपडाही पाठवून बालाराम यांनी राईट बंधूंना अनोखी आदरांजली वाहिली आहे.

    Dr. who has 35 years of experience for a 30-second flight on Mars. The story of Bob Balaram, the stubborn Indian scientist at NASA


    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य