• Download App
    हैदराबादमध्ये गरिबांना भेटला देवदूत, डॉ. व्हिक्टर करतात दहा रुपयात कोरोना रुग्णांवर उपचार।Dr. Victor helping poor in tough time

    हैदराबादमध्ये गरिबांना भेटला देवदूत, डॉ. व्हिक्टर करतात दहा रुपयात कोरोना रुग्णांवर उपचार

    विशेष प्रतिनिधी

    हैदराबाद : सध्या दहा रुपयात एक कप चहाही येत नाही. परंतु हैदराबादचे डॉ. व्हिक्टर इम्यानूएल हे गेल्या तीन वर्षांपासून गरीब रुग्णांकडून केवळ दहा रुपये तपासणी शुल्क आकारत आहेत. सध्या कोरोनाच्या उपचारावर लाखो रुपये खर्च केले जात असताना या ठिकाणी केवळ दहा रुपयांतच गरीब रुग्णांना कोविडवरील उपचाराचर सल्ला दिला जात आहे. Dr. Victor helping poor in tough time

    हैदराबादच्या उप्पल डेपोजवळ क्लिनिक असून डॉ. व्हिक्टर हे पांढरे रेशन कार्ड किंवा अन्न सुरक्षा कार्ड असलेल्या लोकांना दहा रुपये तर जवानांवर मोफत उपचार करत आहेत. विविध वैद्यकीय चाचण्या, औषधाच्या किमती देखील कमी ठेवल्या आहेत. डॉ. व्हिक्टर हे मधुमेह, हृदयविकार यांच्यासह अन्य आजारावर औषधोपचार करतात.


    सरकारने काळ्या बुरशीच्या रुग्णांवर मोफत उपचार करावेत, प्रियांका गांधी


    सध्याच्या कोरोनाच्या काळात खासगी रुग्णालये आणि दवाखान्याकडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले जात आहे. परंतु डॉ. व्हिक्टर हे कोरोनाच्या रुग्णावर केवळ दहा रुपयात उपचार करत असून ते होम आयसोलेशनमध्ये राहण्यासाठी मदत करत आहेत. ते दररोज शंभर रुग्णांवर उपचार करतात, मात्र सध्या कोविडमुळे रुग्णांची संख्या वाढली असून दररोज १४० रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या वर्षभरात वीस ते २५ हजार कोरोना रुग्णावर उपचार केल्याचा दावा डॉ. व्हिक्टर केला आहे.

    एकदा एक महिला रुग्णालयासमोर उपचारासाठी पैसे नसल्याने भीक मागत होती. तिच्या पतीवर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. या घटनेने डॉ. व्हिक्टर यांच्या आयुष्यावर सखोल परिणाम झाला आणि तेथून त्यांनी कमी पैशात लोकांवर उपचार करण्याचे ठरवले.

    Dr. Victor helping poor in tough time

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट