• Download App
    नेहरूंना जबाबदार ठरवत, "हे" स्वतःचे गुन्हे लपवताहेत; डॉ. मनमोहन सिंगांचा मोदींवर थेट हल्लाबोल!!Dr. Manmohan Singh's direct attack on Modi

    Punjab Election : नेहरूंना जबाबदार ठरवत, “हे” स्वतःचे गुन्हे लपवताहेत; डॉ. मनमोहन सिंगांचा मोदींवर थेट हल्लाबोल!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रचारात उडी घेतली, पण ती व्हिडिओ संदेशाद्वारे!! डॉ. मनमोहन सिंग यांचे वय झाले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे पंजाबी जनतेशी संवाद साधला आहे.Dr. Manmohan Singh’s direct attack on Modi

    हा संवाद साधत असताना डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देश अधिकाधिक गरीब होत चालला आहे आणि मूठभर श्रीमंत यांची संपत्ती वाढत आहे, अशा वेळी केंद्र सरकार भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना चुकांसाठी जबाबदार ठरवत आहे आणि स्वतःचे गुन्हे लपवत आहे, अशा शब्दांमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

    एवढ्यावरच डॉ. मनमोहन सिंग थांबले नसून त्यांनी देशाच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणातील चुकांबद्दलही पंतप्रधान मोदींना बरेच काही सुनावले आहे. पंतप्रधानपदाचे महत्त्व हे मोठे आणि अलौकिक असते. त्या पदावर बसलेल्या व्यक्तीने संयमाने भाषा वापरायची असते. आपल्या बोलण्यापेक्षा आपल्या कृतीतून आपल्या कामाचा ठसा उमटवायचा असतो. मी माझ्या पंतप्रधान 10 वर्षाच्या पंतप्रधान पदाच्या काळात फार कमी बोललो. पण माझे काम बोलत होते, असे एकापाठोपाठ एक तडाखे डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींना लगावले. माझ्या सरकारवर त्या वेळच्या विरोधकांनी अनेक आरोप केले. परंतु, मी त्यांना प्रत्युत्तर देत बसलो नाही तर प्रत्यक्ष कामातून मी बोलत राहिलो असाही दावा डॉ. मनमोहन सिंग यांनी केला.

    कोरोना काळात देशातले गरीब अधिक गरीब झाले आहेत आणि मूठभर श्रीमंतांची संपत्ती वाढली आहे. त्यासाठी केंद्र सरकारची विषम आर्थिक धोरणे कारणीभूत आहेत, असा घणाघाती आरोपही फक्त मनमोहनसिंग यांनी केला आहे. देशाची सुरत बदलून सीरत बदलत नाही. दुसऱ्या देशांमधील सतत दौरे काढून बिर्याणी खाऊन परराष्ट्र संबंध सुधारत नाहीत, तर त्यासाठी राजनैतिक पातळीवर वर सतत कष्ट करून प्रयत्न करावे लागतात, असेही डॉ. मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खडसावले.

    डॉ. मनमोहन सिंग यांचे भाषण काँग्रेसने आपल्या विविध सोशल मिडिया हँडल वरून शेअर केले असून त्याला जनतेचा चांगला प्रतिसादही मिळताना दिसत आहे. मात्र, त्यावर भाजपची अद्याप प्रतिक्रिया येणे अपेक्षित आहे.

    Dr. Manmohan Singh’s direct attack on Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bangladesh : बांगलादेशात हिंदू नेत्याची हत्या, भारताची तीव्र प्रतिक्रिया

    France : भारताने घेतला मोठा निर्णय! फ्रान्सकडून खरेदी करणार जगातील सर्वात धोकादायक 40 लढाऊ जेट्स

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी