विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पद्मश्री प्रसिद्ध हदयविकारतज्ज्ञ, इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.के.के.आगरवाल (वय ६२) यांचे कोरोनाने निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना दिल्लीतील ‘एम्स’ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.Dr. K. K. agarwal no more
त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत आगरवाल यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी, जानेवारीत कोरोना लस घेणारा पहिला फ्रंटलाईन वर्कर होण्याचा मानही मिळविला होता
मोटारीतून केलेल्या व्हिडिओतही त्यांनी याबद्दल माहिती दिली होती. वैद्यकीय सेवेतील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना २०१० मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.
गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर कोरोनाशी संबंधित अनेक जनजागृतीपर व्हिडिओ पोस्ट करून त्यांनी नेटिझन्सचे लक्ष वेधले होते. जवळपास दहा कोटी जणांनी ते पाहिले. दुर्देवाने, कोरोनानेच त्यांचा मृत्यू झाला.
Dr. K. K. agarwal no more