• Download App
    केदारनाथ मंदिराची कवाडं उघडली; तब्बल सहा महिन्यानंतर उघडले ; 11 क्विंटल फुलांची आरास।Door's of Kedarnatah Temple are reopened after 6 months

    केदारनाथ मंदिराची कवाडं उघडली; तब्बल सहा महिन्यानंतर उघडले ; 11 क्विंटल फुलांची आरास

    वृत्तसंस्था

    रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिराची कवाडं सहा महिन्यानंतर आज सोमवारी (ता. 17) पहाटे 5 वाजता उघडली. विशेष म्हणजे मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट केली होती. त्यासाठी तब्बल 11 क्विंटल फुलांचा वापर केला. दरम्यान, यंदाही कोरोनामुळे भाविकांना मंदिरात प्रवेशबंदी आहे.  Door’s of Kedarnatah Temple are reopened after 6 months

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी ट्विटरच्या माहिती दिली. ‘संपूर्ण जगात 11 वं ज्योतिर्लिंग म्हणून भगवान केदारनाथची ख्याती आहे. मंदिराची कवाडं सोमवारी पहाटे 5 वाजता परंपरागत पूजा- अर्चा केल्यानंतर उघडली. मेष लग्नाच्या शुभमुहूर्तावर हा विधी पार पडला. मी बाबा केदारनाथ यांच्याकडे सर्वांनाच निरोगी ठेवण्याची प्रार्थना करतो’, असं ट्विट त्यांनी केलं.



    मंदिरात भाविकांसाठी प्रवेश बंदी असला तरीही, भाविकांनी घरुनच केदारनाथाला श्रद्दासुमनं अर्पण करावीत, असे आवाहनही त्यांनी केलं. सोबतच मंदिरात दररोज श्री भीमाशंकर लिंगम् यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोहित दैनंदिन पूजा- अर्चा करतील, अशी माहितीही त्यांनी दिली.

    चारधाम यात्रेवर कोरोनाचं सावट 

    या वर्षीही चारधाम यात्रेवर कोरोनाचं सावट आहे. 18 मे रोजी बद्रीनाथ मंदिराचीही कवाडं परंपरागत तिथीप्रमाणं खुली होणार आहेत. पहाटे सव्वाचार वाजताच्या ब्रह्ममुहूर्तावर ही कवाडं खुली होणार आहेत. येथेही भाविकांना मनाई असली तरीही पुरोहित आणि मंदिर न्यास समितीतील 25 जणांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. यापूर्वी 14 आणि 15 मे रोजी अनुक्रमे यमुमोत्री आणि गंगोत्री मंदिराची कवाडं खोलण्यात आली होती.

    विश्व प्रसिद्ध ग्यारहवें ज्योर्तिलिंग भगवान केदारनाथ धाम के कपाट आज सोमवार को प्रातः 5 बजे विधि-विधान से पूजा-अर्चना और अनुष्ठान के बाद खोल दिए गए। मेष लग्न के शुभ संयोग पर मंदिर का कपाटोद्घाटन किया गया। मैं बाबा केदारनाथ से सभी को निरोगी रखने की प्रार्थना करता हूं।

    Door’s of Kedarnatah Temple are reopened after 6 months

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट