वृत्तसंस्था
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर अकारण गर्दी करू नये, कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनी गाडीच्या निर्धारित वेळेच्या ९० मिनिटांच्या स्लॉटमध्ये स्टेशनवर पोचावे.असे आवाहन पुणे रेल्वे विभागाने केले. Don’t rush to the train station
स्टेशनवरची गर्दी रोखण्यासाठी ३० एप्रिल २०२१ पर्यंत प्लॅटफॉर्मची तिकिटे दिली जात नाहीत. फक्त ज्येष्ठ, दिव्यांग, रूग्ण इत्यादींना प्लॅटफॉर्मची तिकिटे ५० रूपये दराने दिली जात आहेत. कन्फर्म व आरएसी तिकिट असलेल्यानाच प्लॅटफॉर्ममध्ये प्रवेश आणि प्रवासाची परवानगी आहे.
प्रतीक्षा यादीतील प्रवाशांनी गर्दी टाळावी
रेल्वे तिकीट प्रतीक्षा यादीतील प्रवाशांनी स्टेशनवर गर्दी करू नये. विशेष गाड्या पूर्णपणे आरक्षित असून त्यामध्ये सेकंड एसी, थ्री एसी, स्लीपर आणि द्वितीय आसन श्रेणीचे कोच आहेत. या विशेष गाड्यांत सामान्य, अनारक्षित कोच नाहीत.
कन्फर्म तिकीट असलेल्यानी पोचावे
कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनी त्यांच्या गाडीच्या निर्धारित वेळेच्या ९० मिनिटांच्या स्लॉटमध्ये स्टेशनवर पोचावे. रेल्वेचे पीआरएस काउंटर ,आयआरसीटीसी वेबसाईटवरुन तिकीट बुक करण्याची व्यवस्था आहे.
Don’t rush to the train station
महत्वाची बातम्या
- औषधसाठा जप्त करण्याच्या नबाब मलिकांच्या धमकीवर केंद्रातून पियूष गोयलांचे सणसणीत प्रत्युत्तर
- रेमडेसिव्हिरवरून नवाब मलिकांच्या बेछूट आरोपांना केंद्रीय मंत्र्यांचे उत्तर, त्यांना वास्तव माहितीच नाही, महाराष्ट्राशी केंद्राचा सातत्याने संपर्क
- राजकारणापलिकडे जाऊन AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरियांनी कोरोना वाढीच्या कारणांवर नेमके ठेवले बोट… वाचा…
- रेमडेसिवीर इंजेक्शनच्या गरजूंना दिलासा; देशभरातील उत्पादकांनी घटविली MRP विक्रीची किंमत