• Download App
    आमसभेची बैठक कोरोनाची सुपर स्प्रेडर ठरण्याची अमेरिकाला धास्ती, न्यूयॉर्कला न येण्याचे आवाहन। Don’t come for USA for UN summit

    आमसभेची बैठक कोरोनाची सुपर स्प्रेडर ठरण्याची अमेरिकाला धास्ती, न्यूयॉर्कला न येण्याचे आवाहन

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांची (यूएन) पुढील महिन्यात होणारी आमसभेची बैठक सुपर-स्प्रेडर ठरू नये म्हणून न्यूयॉर्कला येऊ नका असे अमेरिकेने म्हटले आहे. Don’t come for USA for UN summit

    आमसभेचे आयोजन २१ ते २७ सप्टेंबर असे आठवडाभर चालेल. त्यात हवामान बदल, लस, अन्नपद्धती, ऊर्जा यांसह वर्णभेदविरोधी यूएन जागतिक परिषदेचा विसावा वर्धापनदिन अशा विषयांवर उच्चस्तरीय बैठका होतील.



    त्यासाठी सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस आणि अध्यक्ष अब्दुल्ला शाहीद यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. जुलैच्या अखेरीस जागतिक नेत्यांना प्रत्यक्ष सहभागाची परवानगी देण्याचा निर्णय यूएनने घेतला. बायडेन प्रशासन मात्र यामुळे चितेंत पडले आहे.

    केवळ सर्वसाधारण चर्चा हाच एकमेव कार्यक्रम प्रतिनिधींच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पार पडावा असे अमेरिकेचे ठाम मत आहे. अमेरिकेने १९२ देशांना एक निवेदनच पाठविले आहे. ही बैठक आणि इतर कार्यक्रम व्हर्च्युअल माध्यमातून पार पडावेत. त्यासाठी प्रवास करणाऱ्यांमुळे आमची न्यूयॉर्कवासी तसेच इतर प्रवाशांना अकारण संसर्गाचा धोका वाढेल, असे त्यात नमूद केले आहे.

    Don’t come for USA for UN summit

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!