• Download App
    देशांतर्गत विमान वाहतूक प्रवास महागणार, विमान वाहतूक मंत्रालयाकडून भाडेवाढीस मान्यता|Domestic air travel will become more expensive, the Ministry of Civil Aviation has approved the fare hike

    देशांतर्गत विमान वाहतूक प्रवास महागणार, विमान वाहतूक मंत्रालयाकडून भाडेवाढीस मान्यता

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या तीन महिन्यात देशांतर्गत विमान प्रवाशांत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.त्यामुळे येत्या १ जूनपासून विमान प्रवास महागणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने हवाई भाड्याची मयार्दा 13 ते 16 टक्क्यांनी वाढविली आहे. त्यामुळे येत्या 1 जूनपासून हे नवे दर लागू केले जाणार आहेत. त्यामुळे देशांतर्गत विमान प्रवास महागणार आहे.Domestic air travel will become more expensive, the Ministry of Civil Aviation has approved the fare hike


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या तीन महिन्यात देशांतर्गत विमान प्रवाशांत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.त्यामुळे येत्या १ जूनपासून विमान प्रवास महागणार आहे.

    नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने हवाई भाड्याची मयार्दा 13 ते 16 टक्क्यांनी वाढविली आहे. त्यामुळे येत्या 1 जूनपासून हे नवे दर लागू केले जाणार आहेत. त्यामुळे देशांतर्गत विमान प्रवास महागणार आहे.



    कोरोनाच्या पहिल्या आणि दुसºया लाटेत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांचे उत्पन्न घटलं आहे. सरकारच्या या निर्णयानंतर विमान कंपन्यांना मदत होणार आहे. दे

    शातील हवाई उड्डाण कालावधीच्या आधारे विमान प्रवासाच्या भाड्याच्या कमी आणि उच्च मयार्दा निश्चित करण्यात आल्या आहेत. ही मयार्दा गेल्यावर्षी 25 मे रोजी लॉकडाऊन उघडण्याच्या वेळी निश्चित केली गेली होती.

    नागरी विमान उड्डाण मंत्रालयाच्या आदेशानुसार, 40 मिनिटांपर्यंतच्या विमान प्रवासाचे साधारण भाडे हे 2,300 रुपये इतके असते. मात्र आता त्यात 13 टक्यांनी वाढ करण्यात आल्याने प्रवाशांना 40 मिनिटांपर्यंतच्या विमान प्रवासासाठी 2600 खर्च करावे लागणार आहेत.

    40 मिनिटांपासून 60 मिनिटांपर्यंत विमान प्रवासासाठी प्रतिव्यक्ती 2,900 रुपयांऐवजी 3,300 रुपये मोजावे लागतील.गेल्यावर्षी मे महिन्यात विमान वाहतूक मंत्रशलयाने देशांतर्गत उड्डाणांसाठी एकूण 7 फेअर बँडची घोषणा केली होती.

    हे 7 बँड प्रवासाच्या वेळेवर आधारित आहेत. यातील पहिला बँड 40 मिनिटांपर्यंत प्रवास करणाऱ्यासाठी आहे. उर्वरित बँड अनुक्रमे 40-60 मिनिटे, 60-90 मिनिटे, 90-120 मिनिटे, 120-150 मिनिटे, 150-180 मिनिटे आणि 180-210 मिनिटे प्रवास करणाºया विमान प्रवाशांसाठी आहेत.

    यात 60-90 मिनिटे, 90-120 मिनिटे, 120-150 मिनिटे, 150-180 मिनिटे आणि 180-210 मिनिटे यांच्या तिकीटाचे दर अनुक्रमे 4,000, 4,700, 6,100, 7,400 आणि 8,700 रुपये इतके आहेत.

    कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं आता 30 जूनपर्यंत रद्द ठेवण्यात येणार आहे. डीजीसीएकडून आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

    त्यामुळे आता भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात जाणाºयांसाठीची विमानं ही 30 जूनपर्यंत बंद राहतील.आंतरराष्ट्रीय मालवाहू विमानसेवा मात्र यातून वगळण्यात आली आहे.

    यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ही 31 मे पर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण वंदे भारत मिशन आणि ट्रॅव्हल बबलअंतर्गत सोडण्यात येणाºया एअरलाईन्सवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. या विमान सेवा पूर्वीप्रमाणेच सुरु राहील.

    Domestic air travel will become more expensive, the Ministry of Civil Aviation has approved the fare hike

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची