मे महिन्यात कोणतीही ऑफलाईन परीक्षा घेऊ नका असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील महाविद्यालयांना दिले आहेत. देशातील सध्याची कोरोना परिस्थिती पाहता कोणत्याही ऑफलाईन परीक्षेचे आयोजन करू नका अशा स्पष्ट सूचना यूजीसीने दिल्या आहेत.Do not take any offline exams in May, UGC orders universities
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मे महिन्यात कोणतीही ऑफलाईन परीक्षा घेऊ नका असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील महाविद्यालयांना दिले आहेत. देशातील सध्याची कोरोना परिस्थिती पाहता कोणत्याही ऑफलाईन परीक्षेचे आयोजन करू नका अशा स्पष्ट सूचना यूजीसीने दिल्या आहेत.
जून २०२१ मध्ये या निर्णयावर पुन्हा एकदा विचार केला जाईल. त्यानंतर ऑफलाईन परीक्षा घेण्याबाबत विचार होऊ शकतो, असे यूजीसीने म्हटले आहे.
मात्र, स्थानिक परिस्थितीनुसार विद्यापीठे ऑनलाईन परीक्षा घेऊ शकतात, असेही यूजीसीने म्हटले आहे. याबाबत यूजीसीने देशातील सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांना पत्र लिहिले आहे.
यूजीसीने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की संपूर्ण देश सध्या कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहेत. या काळात प्रत्येकाचे आरोग्य आणि सुरक्षा महत्वाची आहे. त्यामुळे मे महिन्यात होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात येत आहेत.
मात्र, ऑनलाईन परीक्षा घेण्यास परवानगी देण्यात येत आहे. त्यासाठी महाविद्यालयांनी तयारी करावी. त्याचबरोबर केंद्र सरकार, राज्य सरकार, शिक्षण मंत्रालय आणि यूजीसीकडून दिल्या जाणाऱ्या दिशा निर्देशांचे पालन करावे लागले.
शिक्षण मंत्रालयानेही देशातील इतर संस्थांनाही परीक्षा रद्द करण्यास सांगितले आहे.यामध्ये आयआयटी, एनआयटी, केंद्रीय विश्वविद्यालय यांचा समावेश आहे.
देशातील अनेक राज्यांत कोरोनाच्या संकटामुळे यापूर्वीच पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र, काही विद्यापीठांनी ओपन बुक मेथडसह वैैकल्पिक पध्दतीने परीक्षा घेण्याची तयारी केली होती.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच देशात कोरोनाचा कहर वाढत आहे. दररोज तीन लाखांहून अधिक जण बाधित होत आहेत. त्यामुळे सीबीएसईसह अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्याहोत्या.त्याचबरोबर स्पर्धा परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत.
Do not take any offline exams in May, UGC orders universities
महत्त्वाच्या बातम्या
- सनी लियोनी कामगारांसाठी करणार हे काम, दहा हजार जणांना देणार जेवण
- लष्करासाठी क्रांतीकारी निर्णय, लष्करी अधिकाऱ्यांना सचिव स्तराचे अधिकार, फाईलींचा निपटारा जलदगतीने होणार
- बड्या वृत्तसमुहांकडून फेक न्यूजद्वारे योगी आदित्यनाथांची बदनामी, म्हणे गोशाळांमध्ये गाईंची कोरोना तपासणी करण्याचे काढले आदेश
- पाकिस्तानात कोरोनाचा उद्रेक, अनेक प्रांतात पूर्ण लॉकडाऊन, बंदोबस्तासाठी लष्कर तैनात