Tuesday, 13 May 2025
  • Download App
    "थांबू नका, भ्रष्टाचार विरोधातील लढाईत अजिबात संकोच करू नका" - पंतप्रधान मोदींचे CBIला उद्देशून विधान! Do not stop hesitate in fight against corruption PM Modi tells CBI

    “थांबू नका, भ्रष्टाचार विरोधातील लढाईत अजिबात संकोच करू नका” – पंतप्रधान मोदींचे CBIला उद्देशून विधान!

    PM Modi new

    सीबीआयने आपल्या कामातून आणि तंत्राने लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) च्या हीरक महोत्सवी सोहळ्याला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्य्यावरून मार्गदर्शन करताना, सीबीआयला भ्रष्टाचारविरोधातील लढाईत अजिबात थांबू नका आणि कोणताही संकोच करू नका. असे म्हटले आहे. Do not stop hesitate in fight against corruption PM Modi tells CBI

    पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘’जिथे भ्रष्टाचार होतो, तिथे तरुणांना योग्य संधी मिळत नाही. भ्रष्टाचार हा प्रतिभेचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि येथूनच घराणेशाही आणि कुटुंबवादाला बळ मिळाले आहे. यापूर्वीच्या सरकारांमध्ये खूप भ्रष्टाचार झाला होता. आज देशात भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची कमतरता नाही. तुम्हाला कुठेही संकोच करण्याची, कुठेही थांबण्याची गरज नाही. सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी आपल्याला नवीन मार्ग शोधावे लागतील आणि यात तंत्रज्ञान-सक्षम उद्योजक आणि तरुणांची मोठी भूमिका आहे. ’’


    Delhi Liquor Scam : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, १७ एप्रिलपर्यंत तुरुंगातच असणार मुक्काम!


    याचबरोबर “भ्रष्टाचाऱ्यांनी देशाची तिजोरी लुटण्याचा आणखी एक मार्ग काढला होता, जो अनेक दशकांपासून सुरू होता.  तो म्हणजे  सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या लूटीचा होता. आज जनधन, आधार, मोबाईल या त्रिमूर्तीमुळे प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा पूर्ण हक्क मिळत आहे. २०१४ नंतर,  आमची पहिली जबाबदारी होती व्यवस्थेवरील विश्वास पुर्नस्थापित करणे. त्यामुळेच आम्ही काळा पैसा, बेनामी संपत्तीबाबत मिशन मोडवर कारवाई सुरू केली.’’ असं मोदींनी यावेळी सांगितलं.

    मोदी म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांबरोबरच आम्ही भ्रष्टाचाराच्या कारणांशीही लढत आहोत. आजही जेव्हा एखाद्या प्रकरणाची उकल होत नाही तेव्हा ते सीबीआयकडे सोपवण्याची मागणी होते. सीबीआयने आपल्या कामातून आणि तंत्राने लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.’’

    Do not stop hesitate in fight against corruption PM Modi tells CBI

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट

    Icon News Hub