• Download App
    दिवाळी सण जश्न-ए-रिवाज नाही,तेजस्वी सूर्या यांनी सूनवल्यावर फब इंडियाने मागे घेतली जाहिरात|Diwali is not a Jashn-e-Rivaj, Fab India withdraws ad after Tejaswi Surya slamed it

    दिवाळी सण जश्न-ए-रिवाज नाही,तेजस्वी सूर्या यांनी सूनवल्यावर फब इंडियाने मागे घेतली जाहिरात

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : फॅब इंडिया कंपनीच्या ‘जश्न-ए-रिवाज’ या जाहिरात मोहिमेविरोधात भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष बंगळुरूचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी विरोध केला आहे. ‘दिवाळी सण जश्न-ए-रिवाज नाही. त्याला विरोध केला पाहिजे आणि फॅब इंडियावर बहिष्कार घातला पाहिजे. फॅब इंडियासारख्या कोणत्याही ब्रँडला अशा कृत्यासाठी आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते, असा इशारा त्यांनी दिला.Diwali is not a Jashn-e-Rivaj, Fab India withdraws ad after Tejaswi Surya slamed it

    फॅब इंडियाने ही जाहिरात मागे घेतली आहे. #BoycottFabIndia सकाळपासून सोशल मीडियावर टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. हा वाद फॅब इंडिया या कपडे, घर सजावट आणि जीवनशैली उत्पादनांशी संबंधित कंपनीचा आहे – ‘आम्ही प्रेम आणि प्रकाशाच्या सणाचे स्वागत करतो. फॅब इंडिया जश्न-ए-रिवाज कलेक्शन सादर करत आहे.



    पद्मश्री आणि मणिपाल ग्लोबल एज्युकेशनचे अध्यक्ष मोहनदास पै यांनीही फॅब इंडियाच्या ‘जश्न-ए-रिवाज’ मोहिमेवर आक्षेप घेतला. त्यांनी ट्विटरवर लिहिले, ‘फॅब इंडियाचे दिवाळीनिमित्त अत्यंत लज्जास्पद विधान आहे! हा ख्रिसमस आणि ईद सारखाच हिंदूंचा धार्मिक सण आहे! असे विधान धार्मिक सण संपवण्यासाठी मुद्दाम केलेला प्रयत्न दर्शवते.

    फॅब इंडियाने एक ट्विट करत म्हटले होते की, “आम्ही प्रेम आणि प्रकाशाचा सणाचे स्वागत करतो, फॅबइंडिया द्वारे जश्न-ए-रिवाज ही अशी एक संकल्पना आहे जी भारतीय संस्कृतिला समर्पित करते.”, याला सोशल मीडियावर जोरदार विरोध झाला. त्यानंतर हे ट्विट फॅबइंडियाने डिलीट केले आहे.

    Diwali is not a Jashn-e-Rivaj, Fab India withdraws ad after Tejaswi Surya slamed it

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो