• Download App
    पृथ्वीपासून तब्बल ७२५ प्रकाशवर्षे अंतरावरावरील गुरू सदृष्य ‘ग्रहा’चा शोध । Discovery of a Jupiter-like planet 725 light-years from Earth

    पृथ्वीपासून तब्बल ७२५ प्रकाशवर्षे अंतरावरावरील गुरू सदृष्य ‘ग्रहा’चा शोध

    वृत्तसंस्था

    बंगळूर : पृथ्वीपासून ७२५ प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या एका ताऱ्याभोवती गुरू ग्रहासारखा ग्रह फिरत असल्याचा शोध भारतीय शास्रज्ञांनी लावला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) अहमदाबाद येथील भौतिकी प्रयोगशाळेने (पीआरएल) हा नवा ग्रह शोधला आहे. Discovery of a Jupiter-like planet 725 light-years from Earth

    हा नवा ग्रह एच.डी.८२१३९ नावाच्या ताऱ्याभोवती फिरतो. टीओआय कॅटलॉगनुसार ग्रहाचे नाव १७८९ बी तर हेन्री ड्रेपर कॅटलॉगनुसार एचडी ८२१३९बी आहे. गुरू ग्रहाच्या तुलनेत वस्तुमान ७० टक्के आणि आकार १.४ पटीने जास्त असून ताऱ्याभोवती फिरण्याचा कालावधी फक्त ३.२ दिवसांचा आहे
    डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ दरम्यान यासंबंधी निरीक्षणे घेण्यात आली होती. जर्मनी येथील टीसीईएस स्पेक्ट्रोग्राफने एप्रिल २०२१मध्ये, तसेच माउंट अबू येथील प्रयोगशाळेने या शोधाची पुष्टी केली आहे.



    अहमदाबाद येथील शास्रज्ञांचा गट अशा बाह्यग्रहांचा शोध घेत असून, २०१८ मध्ये त्यांनी शनीच्या आकाराचा के२-२३६ या बाह्यग्रहाचा शोध घेतला होता. पीआरएलमधील ऑप्टिकल फायबर फेड स्प्रेक्ट्रोग्राफ प्रकारातील ही प्रयोगशाळा देशातील पहिली प्रयोगशाळा आहे. पीआरएल येथील अत्याधुनिक रॅडीयल व्हेलॉसिटी अबू स्काय सर्च (पारस) या ऑप्टिकलफायबर फेड स्प्रेक्ट्रोगाफीच्या माध्यमातून हे संशोधन करण्यात आले आहे.

    Discovery of a Jupiter-like planet 725 light-years from Earth

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला