• Download App
    दिव्यांगांना केंद्र सरकारचा दिलासा, आता प्रमाणपत्र ऑनलाईनच मिळणार|Disabled people will get relief from the central government, now they will get the certificate online

    दिव्यांगांना केंद्र सरकारचा दिलासा, आता प्रमाणपत्र ऑनलाईनच मिळणार

    दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र शासकीय रुग्णालयातून मिळविण्यासाठी दिव्यांगाचे प्रचंड हाल होतात. तासोनतास रांगेत थांबावे लागते. त्यांच्यासाही आता केंद्र सरकारकडून दिलासादायक बातमी आहे. आता प्रत्येक राज्याला दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे.Disabled people will get relief from the central government, now they will get the certificate online


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र शासकीय रुग्णालयातून मिळविण्यासाठी दिव्यांगाचे प्रचंड हाल होतात. तासोनतास रांगेत थांबावे लागते.

    त्यांच्यासाही आता केंद्र सरकारकडून दिलासादायक बातमी आहे. आता प्रत्येक राज्याला दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे.



    केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार, आता दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध करुन देणं अनिवार्य असणार आहे. सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाने याबद्दलचा अध्यादेश जारी केला आहे. मंत्रालयाने याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

    त्याचबरोबर मंत्रालयाच्या दिव्यांग विभागाने याबद्दलचं ट्विटही केलं आहे. या ट्विटमध्ये म्हटलं आहे, दिव्यांग प्रमाणपत्र आता फक्त पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध करुन देणं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आता बंधनकारक असणार आहे. हा आदेश १ जूनपासून लागू होणार आहे.

    गेल्या काही दिवसांपासून ही मागणी जोर धरु लागली होती. करोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे लागू केलेल्या विविध निबंर्धांमुळे दिव्यांगांना हे प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत होत्या. या प्रमाणपत्रामुळे दिव्यांग नागरिकांना अनेक सरकारी सेवासुविधांचा लाभ घेता येणार आहे.

    Disabled people will get relief from the central government, now they will get the certificate online

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे

    Rahul Gandhi : RSS च्या कौतुकावरून दिग्विजय सिंह यांना राहुल गांधींनी फटकार, म्हणाले- तुम्ही चुकीचे केले