• Download App
    ज्योतिरादित्य यांनी गद्दारी केली नसती तर कमलनाथ यांचे सरकार टिकले असते; दिग्विजय सिंग यांचा हल्लाबोल Digvijay singh took on jyotiraditya scindia over joining BJP, called him a traitor

    ज्योतिरादित्य यांनी गद्दारी केली नसती तर कमलनाथ यांचे सरकार टिकले असते; दिग्विजय सिंग यांचा हल्लाबोल

    वृत्तसंस्था 
    भोपाळ : काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी विद्यमान नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. शिंदे महाराजांनी गद्दारी केली नसती, तर मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे सरकार टिकले असते अशा शब्दांमध्ये दिग्विजय सिंग यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर प्रहार केला आहे. ग्वालियर मध्ये येथे एका कार्यक्रमात बोलत होते. Digvijay singh took on jyotiraditya scindia over joining BJP, called him a traitor
    ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसमध्ये राहून सगळे लाभ घेतले. त्यांना काँग्रेसने मंत्रीपदे दिली. खासदार केले. हे सगळे लाभ घेतल्यानंतर ते भाजपमध्ये गेले. तिथे आता मंत्री झाले आहेत, पण सगळ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की गद्दारी करणाऱ्यांना जनता
    कधीच विसरत नाही, असा इशारा देखील दिग्विजय सिंग यांनी दिला आहे.

    मानहानी प्रकरण: कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरूद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी


    दिग्विजय सिंग यांच्या वक्तव्यामुळे कमलनाथ यांच्या राजकीय जखमेवरची खपली निघाली आहे. मध्य प्रदेशातले कमलनाथ सरकार काँग्रेसमधल्या पंधरा आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे पडले होते. हे पंधरा आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांचे समर्थक होते. त्यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री पद हवे होते. परंतु, काँग्रेस नेत्यांनी ते पद दिले नाही त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पासून वेगळी वाट काढत भाजपचा रस्ता धरला.
    भाजप मध्ये आल्यानंतर सुमारे वर्षभराने त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळात स्थान देऊन नागरी हवाई वाहतूक मंत्री केले. या राजकीय पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंग यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या वैयक्तिक टीका केली आहे. त्याच वेळी त्यांनी कमलनाथ यांच्या राजकीय जखमेवरची खपली देखील काढली आहे.

    Digvijay singh took on jyotiraditya scindia over joining BJP, called him a traitor

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य