• Download App
    हुकूमशहा किम जोंगने सांगितले कोरोनाचे खरे कारण : एलियन्सनी फुग्यातून व्हायरस पसरवल्याचा दावा|Dictator Kim Jong-un reveals the real cause of coronavirus: Aliens claim to have spread the virus from bubbles

    हुकूमशहा किम जोंगने सांगितले कोरोनाचे खरे कारण ; एलियन्सनी फुग्यातून व्हायरस पसरवल्याचा दावा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन आपल्या विचित्र विधानांमुळे चर्चेत राहतो. जगभरात चर्चा होत असलेल्या कोरोनाबाबत पुन्हा एकदा त्यांनी वक्तव्य केले आहे. एलियन्समुळे कोरोना पसरत असल्याचा दावा किम जोंग यांनी केला आहे.Dictator Kim Jong-un reveals the real cause of coronavirus: Aliens claim to have spread the virus from bubbles

    किम जोंग म्हणाले की, देशातील पहिला कोरोनाचा रुग्णही एलियन्समुळे सापडला आहे. दक्षिण कोरियाशी जोडलेल्या सीमेवरून एलियन्सने हा विषाणू फुग्यातून फेकल्याचे सांगितले. तेव्हापासून देशात कोरोना विषाणूचा फैलाव झाला आहे.



    2 जणांकडून एलियन वस्तूला स्पर्श

    उत्तर कोरियामध्ये एप्रिलमध्ये 18 वर्षीय सैनिक आणि 5 वर्षांच्या मुलाने ‘एलियन सदृश वस्तू’ला स्पर्श केल्याची अफवा पसरली आहे. यानंतर दोघांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली.

    मात्र, शेजारी देश दक्षिण कोरियाने एलियन्सपासून पसरणाऱ्या या सिद्धांताला मूर्खपणाचे म्हटले आहे. सेऊलमधील एका प्राध्यापकाचे म्हणणे आहे की किम जोंगच्या दाव्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे कारण वस्तूंमधून विषाणू पसरण्याची शक्यता खूपच कमी आहे.

    परकीयांपासून सावध राहण्याचा सल्ला

    उत्तर कोरियाची वृत्तसंस्था KCNA नुसार, सरकारने सीमेला लागून असलेल्या भागांसाठी काही सूचना दिल्या आहेत. सरकारने म्हटले आहे की सीमेजवळ राहणाऱ्या लोकांनी हवेतून येणाऱ्या गोष्टी म्हणजे फुगे आणि एलियन यांसारख्या गोष्टींपासून सावध राहावे. असा प्रकार कोणाला दिसल्यास पोलिसांना कळवा.

    मे महिन्यात कोरोनाची माहिती जाहीर

    सुमारे अडीच वर्षे कोरोना विषाणूपासून वाचल्याचा दावा केल्यानंतर, उत्तर कोरियामध्ये एप्रिलच्या अखेरीपासून सुमारे 20 लाख लोक गूढ तापाने ग्रस्त होते. 12 मे रोजी उत्तर कोरियाने जाहीर केले की त्यांच्या देशात प्रथमच कोरोना विषाणू आढळला आहे. यानंतर किम जोंगने संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केले.

    Dictator Kim Jong-un reveals the real cause of coronavirus: Aliens claim to have spread the virus from bubbles

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य