विशेष प्रतिनिधी
काशी : माणसे शेवटच्या दिवशी शेवटच्या काळात काशीमध्ये येतात अशी अश्लाघ्य टीका समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता परंतु त्यांना उद्देशून केली खरी, पण त्याला पंतप्रधान मोदींनी काल रात्रीच कृतीतून उत्तर देऊन टाकले. दिवस कोणतेही असो तर ध्येय पथ पर चल रहे है हे कधी थांबणार नाही हेच पंतप्रधान मोदींनी दाखवून दिले…!! Dhyay is walking on the path; Modi inspects Benaras railway station at half past midnight !!
मोदी हे संघाचे स्वयंसेवक आहेत. संघाच्या पद्यामध्ये “ध्येय पथ पर चल रहे है”, एक महत्वाचे पद्य आहे. त्याचाच प्रत्यय त्यांनी काशीमध्ये आणून दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विश्रांती नाही. ते स्वतः अनावश्यक विश्रांती घेत नाहीत. इतरांना घेऊ देत नाहीत. काशी विश्वनाथ कॉरिडोर या उद्घाटन झाले. सायंकाळी ते गंगा आरतीत सहभागी झाले त्यानंतर मुख्यमंत्र्यांसमवेत एक फोटो अपॉर्च्युनिटी झाली. अधिकृत कार्यक्रम संपले. पण त्यानंतरही मोदींनी विश्रांती न घेता काशि विश्वनाथ कॉरिडॉरची पाहणी केली. उर्वरित कामे वेगात कशी पूर्ण करता येतील याविषयी मार्गदर्शन केले.
काशी विश्वनाथ कॉरिडोरचा फक्त पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसरा टप्पा पूर्ण व्हायचा आहे. तो वेगात पूर्ण कसा करता येईल त्यादृष्टीने पंतप्रधान मोदी यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मोदी बनारस रेल्वे स्टेशनवर गेले. रेल्वे स्टेशनच्या सोयी सुविधांची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी रात्रीचा एक वाजला होता. मोदींनी स्वतः आपल्या ट्विटर हँडलवरून बनारस रेल्वे स्टेशनचे फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये मोदी एका ङिजिटल हँगिंग क्लाॅक खाली उभे आहेत आणि त्यामध्ये 01:13 वाजले आहेत हे दिसत आहे. माणसे शेवटच्या दिवसांमध्ये काशीमध्ये येतात, अशी टीका अखिलेश यादव यांनी मोदींचे नाव न घेता केली आहे. पण दिवस कोणतेही असोत “ध्येय पथ पर चल रहे है” हेच मोदींनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.